शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनाच आता वाहतूक पोलीस बनण्याची संधी; महाट्रॅफिक अ‍ॅपची सुविधा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:26 IST

वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’ ही सुविधा सुरू केली आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांनाही वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून या अ‍ॅपवर टाकल्यास, वाहतूक पोलिसांना वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे सोयीचे होईल .

ठळक मुद्देवाहतूक नियमांचे उल्लंघन पडणार महागात! ; तक्रारदाराबद्दल गोपनीयता

सांगली : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आता वाहनधारकांसाठी महागात पडणार आहे. वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून नियम तोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याला चाप लावण्यासाठी ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या अ‍ॅपवर नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांची छायाचित्रे अपलोड केल्यास संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’ ही सुविधा सुरू केली आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांनाही वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून या अ‍ॅपवर टाकल्यास, वाहतूक पोलिसांना वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे सोयीचे होईल. ट्रिपल सीट, भरधाव वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्टचा वापर न करणे, स्टॉप लाईन क्रॉस करणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, वाहनास फॅन्सी नंबर प्लेट बसविणे आदीसह वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे व अन्य वाहतूक नियम असोत किंवा अपघात होणे, रस्त्यावर आॅईल सांडून अपघात होणे, वाहने रस्त्यात ब्रेक डाऊन होणे, धोकादायक रस्ता आदी गोष्टींची माहिती छायाचित्र काढून या अ‍ॅपवर पाठवता येणार आहे.

एखाद्या नागरिकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहन चालकाचे छायाचित्र महाट्रॅफिक अ‍ॅपवर टाकल्यावर, वाहतूक शाखेतून त्या वाहनाची माहिती घेण्यात येईल. त्यांना मोबाईलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलचा संदेश पाठविला जाईल. नंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल व संबंधित तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

छायाचित्र अपलोड : कसे कराल ?महाट्रॅफिक अ‍ॅपवर गेल्यावर सिव्हिलियन रिपोर्ट असा फोल्डर आहे. त्यामध्ये व्हायोलेशन रिपोर्ट व इन्सिडंट रिपोर्ट असे विभाग आहेत. यातील व्हायोलेशन रिपोर्टमध्ये नागरिकांना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून अपलोड करायचे आहे. तसेच इन्सिडंट रिपोर्टमध्ये अपघात झाला असल्यास किंवा अपघात घडण्याची शक्यता असेल व त्याठिकाणी पोलीस कर्मचारी नसेल, तर फोटो काढून टाकल्यास त्याची माहिती पोलिसांना होणार आहे.

पोलीस दलातर्फे महाट्रॅफिक अ‍ॅप सुरू करण्यात आले. गेल्या आठ दिवसात या अ‍ॅपवर शंभर ते दीडशे तक्रारी आल्या आहेत. अ‍ॅपबाबत पोलिसांकडून नागरिकांत जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात वाहतूक पोलिसांची संख्या मर्यादित आहे. आता अ‍ॅपमुळे नागरिकांना वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजाविता येईल. तरी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची छायाचित्रे अ‍ॅपवर पाठवून वाहतुकीला शिस्त लावण्यात योगदान द्यावे.- अतुल निकम, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी