शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कामटेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा सीआयडीची फिर्याद : अनिकेत कोथळे, अमोल भंडारे यांच्या पलायनाचा बनाव अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:25 IST

सांगली : पोलीस कोठडीत स्वत:च्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेत व त्याचा साथीदार अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी

सांगली : पोलीस कोठडीत स्वत:च्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेत व त्याचा साथीदार अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी अटकेतील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सीआयडीने फिर्याद दाखल केली आहे.कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली. पोलिस कोठडीत अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला. यानंतर अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला. याप्रकरणी मुख्य संशयित युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली.अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटेने अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव रचला. अनिकेतचा मृतदेह पोलीस व्हॅनमध्ये ठेवला. अमोल भंडारे कोणाला दिसू नये, यासाठी त्याला बाहेरील दोन लोकांच्या ताब्यात दिले. हे दोन लोक भंडारेला घेऊन कृष्णा नदीच्या घाटावर बसले होते. ही बाब तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे खोटी फिर्याद दाखल करुन वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल केल्याप्रकरणी कामटेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.एकूण आठ गुन्हे दाखलकामटेविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, संगनमत, कट रचणे, बळजबरीने एखादी गोष्ट कबूल करण्यासाठी बेदम मारहाण करणे, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी, सर्वांचा सामाईक उद्देश व अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी फिर्याद, असे नऊ गुन्हे दाखल केले आहेत.