इस्लामपूर : प्रथम स्वत:ची ओळख करुन घेऊन क्षमता व आवडीप्रमाणे क्षेत्र निवडा़ मात्र जे क्षेत्र निवडाल, त्यामध्ये उत्तम व प्रतिभावंत बनण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला देऊन, विद्यार्थ्यांनी बुध्दिमत्तेचे मोजमाप गुणांच्या टक्केवारीत करणे ही चूक नव्हे, तर गंभीर बाब आहे, असा इशारा पुणे येथील माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शुक्रवारी दिला़ येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ‘जयंत करिअर फेअर’च्या उद्घाटन समारंभात धर्माधिकारी बोलत होते़ प्रारंभी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते जयंत करिअर गाईडन्स सेंटर व जयंत करिअर फेअरचे उद्घाटन करण्यात आले़ तृप्ती पाटील (कापूसखेड) या मुलीस ड्रॉमधून मोफत प्रवेश देण्यात आला.धर्माधिकारी म्हणाले, एखादा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर झाली, दहावी, बारावीला उत्तम गुण मिळविले, म्हणजे तो अथवा ती बुध्दिमान, या ठोकळाबाज व्याख्येने आपण मुला-मुलींवर अन्याय करीत आहोत़ प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली चालत असते़ आमदार जयंत पाटील म्हणाले, जगात काहीही अशक्य नाही. फक्त निश्चित ध्येय व अचूक मार्गदर्शनाची गरज आहे़ करिअर गाईडन्स सेंटरच्या माध्यमातून ते आम्ही देणार आहोत़ संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. करिअर सेंटरचे संचालक एस़ पी़ यादव यांनी आभार मानले़ याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सदस्य टी़ ए़ चौगुले, व्ही़ डी़ माने, प्राचार्य विश्वास सायनाकर, सुहास पाटील, अॅड़ धैर्यशील पाटील, प्राचार्य राजेंद्र कुरळपकर, विलास काळे, सौ. प्रज्ञा घोरपडे, सुनील नवले, चंद्रकांत मगदूम, डॉ़ एऩ टी़ घट्टे, संदीप गिड्डे, संतोष पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)योग्यवेळी योग्य संधी गरजेची ॉयावेळी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, एखादा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर झाली, दहावी, बारावीला उत्तम गुण मिळविले, म्हणजे तो अथवा ती बुध्दिमान, या ठोकळाबाज व्याख्येने आपण मुला-मुलींवर अन्याय करीत आहोत़ प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली चालत असते़ फक्त त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना त्या-त्या क्षेत्रात योग्यवेळी योग्य संधी मिळण्याची गरज असते.
स्वत:ची ओळख जाणून आवडीप्रमाणे क्षेत्र निवडा
By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST