शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औषध उद्योगाला चीनचा मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 07:10 IST

कच्च्या मालाच्या किमती वाढविल्या : ड्रग मॅन्युफॅक्चरर्स करणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : औषधांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत चीनने १० ते २० टक्के वाढ केल्यामुळे भारतीय औषध उद्योगाला दणका बसला आहे. त्यामुळे काही प्रमाणात औषध उद्योगांच्या नफ्यावर तसेच काही औषधांच्या किमतीवर याचा परिणाम होणार आहे. दुसरीकडे या प्रश्नाबाबत आता इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सरकारशी चर्चा करणार आहे.

प्रतिजैवक औषधे, स्टिरॉइड व अन्य विविध प्रकारच्या औषधांसाठी लागणारा ९० टक्के कच्चा माल हा चीनमधून आयात केला जातो. गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील तणावाबरोबरच व्यापारी तणावही दोन्ही देशांमध्ये वाढले आहेत. आता कच्च्या मालाच्या किमतीत वाढ करण्यास सुरुवात करून चीनने पुन्हा नवी खेळी केली आहे. भारतातील औषध उद्योगाला याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. औषध दर नियंत्रण कायद्यामुळे दरवाढ झाली नाही तरी, उद्योगांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे औषध उद्योगातून चीनच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. तरीही याबाबत भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी पाऊल उचलले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सेफ्लॉस्पोरीन, अजिथ्रोमायसीन, पेनिसिलीन यासारख्या महत्त्वाच्या प्रतिजैविक औषधे उत्पादन करणाºया उद्योगांना सध्या पूर्णपणे चीनवर अवलंबून रहावे लागत आहे. अवलंबित्व अधिक असल्याने चीन या उद्योगातील अडचणी वाढवत असल्याचे दिसत आहे. हैदराबाद, मुंबई, पुणे, हिमाचल प्रदेश, चेन्नई, बेंगलोर, अहमदाबाद, वडोदरा, वापी, सिक्कीम, कोलकाता ही ठिकाणे फार्मास्युटिकल हब म्हणून ओळखली जातात. याठिकाणचे उद्योजक चीनच्या दरवाढीच्या धोरणावर नाराज आहेत. इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश दोशी म्हणाले की, याचा परिणाम औषध उद्योगावर होणार आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरु आहे.चीनकडून भारताला कायमचा त्रासभारतातील औषध निर्मिती उद्योग मोठा आहे. २0१९ मध्ये देशांतर्गत औषध उलाढाल १.४ लाख कोटी इतकी होती. २०२०च्या सहा महिन्यात भारतातून सुमारे १ हजार ८४५ कोटी रुपयांची औषधे निर्यात केली गेली आहेत. देशांतर्गत व देशाबाहेरील औषधांचा भारताचा व्यापार मोठा असल्याने चीनकडून या उद्योगात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.चीनचे कच्च्या मालाबाबत असेच धोरण राहिले, तर भारताला अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल. १९९0 पूर्वी बºयाचशा प्रमाणात भारतात कच्चा माल तयार केला जात होता. तशी यंत्रणा पुन्हा उभी राहिली आणि काही पर्यायी निर्यातदार शोधले तर यातून मार्ग निघू शकतो. याबाबत सरकारच योग्य निर्णय घेऊ शकते. सरकारही आत्मनिर्भर धोरणाअंतर्गत या गोष्टींबाबत प्रयत्न करीत आहेत. आमचे प्रतिनिधी त्याबाबत सरकारशी चर्चा करतील.- महेश दोशी, अध्यक्ष, इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयindia china faceoffभारत-चीन तणाव