सांगली : एलबीटीला (स्थानिक संस्था कर) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवलेल्या नव्या करालाही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. यासाठी विचारविमर्श करुन आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांची बुधवारी सांगलीत बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी एलबीटीला नवा पर्याय देणारी करप्रणाली सूचित केली होती. याची माहिती देण्यासाठी ठाणे येथे व्यापाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची काल (शुक्रवार) बोलावण्यात आली होती. या बैठकीला सांगलीतील अप्पा कोरे, सुरेश पटेल, धीरेन शहा आदी उपस्थित होते. माहिती देण्यासाठी अर्थविभागाचे सचिव श्रीकांत श्रीवास्तव, नितीन करीर, असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते. एलबटीसाठी सूचवलेला नवा पर्याय हा नवा नाही. नवीन करात थेट खरेदीवर टॅक्स लावण्यात आला आहे. सेटआॅफची सुविधा त्यामध्ये नाही. व्हॅटमध्ये समाविष्ट नसलेले पण जकातीतील समाविष्ट वस्तू यामध्ये येणार आहेत. कर वाढणार नाहीत वचनबद्धता नाहीत. हा कर महापालिका क्षेत्रात लागू असणार असून यामुळे नगरपालिका व महापालिकेत स्पर्धा वाढणार आहे. यामुळे या कराला विरोध करण्यात आला आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या नव्या करालाही विरोध
By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST