शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगडमध्ये 2 ऑक्टोबरपासून चेकपोस्ट बंदसाठी चक्काजाम, वाहतूकदार संघटनेचा इशारा

By संतोष भिसे | Updated: September 18, 2023 15:47 IST

तासवडेचा पथकर कमी करण्याचीही मागणी 

सांगली : महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड राज्यातील चेकपोस्ट हटविण्यासाठी वाहतूकदार संघटनेने निर्णायक इशारा दिला आहे. येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत निर्णय झाला नाही तर चक्काजाम करण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूकदार संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले, देशभरातील चेक पोस्ट (तपासणी नाके )काढण्याचे वाहतूक खर्च कमी करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. तरीही 13 राज्यात नाके कार्यरत आहेत. इतर राज्यानी नव्या तंत्राचा वापर सुरु केला. गुजरातमध्ये तो यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रात मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत बैठक झाली. परिवहन विभागाच्या सचिवांनी चेक पोस्ट बंद करण्याचा अहवाल सरकारला सादर, पण कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दिल्लीतील परिषदेत यावर विचार झाला. महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांना निर्वांनीचा इशारा दिला. 2 ऑक्टोबरपर्यंत शासनाला मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घ्यावा लागेल. चक्काजाम करावा लागेल. याबाबत शासनाला कळवले आहे. चेक पोस्टवरील भ्रष्टाचार खूपच मोठा आहे. त्यामुळे ते बंद झालेच पाहिजेत. कलशेट्टी म्हणाले, शासनाने किमान भाडे व त्याची व्याख्या निश्चित करावे अशीही मागणी आहे.जयंत शिंदे म्हणाले, बँका व वित्त संस्थानी कर्जाच्या वसुलीसाठी खासगी एजन्सी नेमल्या आहेत. त्यांच्याकडून दादागिरी होते. सध्या वाहतूक व्यवसायातील मंदीमुळे हप्ते व कर्ज फेडीची मुदत वाढवून देण्यासाठी बँकांना पत्रे लिहिली आहेत.मयंक शाह म्हणाले, तासवडे पथ कर नाक्यावरील टोल  वसुलीचा फेरविचार करण्याचीही मागणी आहे. किणी, तासवडे टोल नाक्याचा खर्च वसुल झाल्याने तेथे 40 टक्के वसुली करावी अशी मागणी आहे. वसुलीबाबत माहिती अधिकारात माहिती घेत आहोत. त्यामध्ये अतिरिक्त वसुली झाल्याचे निष्पन्न झाल्यास पैसे परत करावेत अशीही मागणी आहे.यावेळी सुरेंद्र बोळाज, आशिष सावळे, संदीप तांबडे, निलेश गोरे, सुहास पाटील, विठ्ठल गावंडे, नागेश म्हारगुडे आदी उपस्थित होते.बोगस चलनाद्वारे फसवणूक ई चलन अधिकृत संकेत स्थळावरून निघावीत. बोगस संकेत स्थळावरून बोगस चलन निघत आहेत, त्याद्वारे फसवणूक होत आहे. याला शासनाने आळा घालावा. पोलिसांनीही स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढणे बेकायदेशीर आहे. यामुळेच लाखो चलने प्रलंबित आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीtollplazaटोलनाका