शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत समाजाची भाजप सरकारकडून फसवणूक : विश्वनाथ मिरजकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:25 IST

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. मात्र मागील पाच वर्षात भाजपकडून समाजाची फसवणूक झाली असून समाजाचा प्रश्न सोडविला नसल्याची टीका समाजाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजातील लोकांनी विचार करून मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ठळक मुद्देलिंगायत समाजाची भाजप सरकारकडून फसवणूक : विश्वनाथ मिरजकरलोकांनी विचार करून मतदान करावे

सांगली : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. मात्र मागील पाच वर्षात भाजपकडून समाजाची फसवणूक झाली असून समाजाचा प्रश्न सोडविला नसल्याची टीका समाजाचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजातील लोकांनी विचार करून मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.सांगलीमध्ये लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज्य नेते वसंतराव नगरकर आणि विश्वनाथ मिरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून आगामी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबत मागील काही वर्षांपासून मागणी केली जात आहे. त्यासाठी समाजाची चळवळ गेल्या सहा महिन्यात तीव्र करण्यात आली होती. केवळ आरक्षण नको असून राजकीय आरक्षण हवे आहे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. आरक्षणासाठी सरकारविरोधात आंदोलन केले.

हिंदू लिंगायत मधील पोट जातींवर अन्याय होत असून त्यांना आरक्षण मिळत नाही. मात्र सरकारकडून अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे समाजाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.गत आठवड्यात समाजातील एका गटाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते, परंतु निवडणुकीवर बहिष्कार करणे हा पोरकटपणा आहे. त्यामुळे समाजाने निवडणुकीवर बहिष्कार घालू नये. मात्र कोणाला मतदान करायचे हे समाजातील लोकांनी ठरवावे, असे आवाहन मिरजकर यांनी केले.

नाक दाबून धरल्याशिवाय तोड उघडणार नाही. राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघातील निकाल बदलण्याची ताकद लिंगायत समाजामध्ये आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज सरकारला आहे. समाजाला कुणी बाजूला ठेवू नये. आरक्षण मिळेपर्यंत लढाई चालू ठेवली जाईल.

विधानसभा निवडणुकीपर्यंत धरणे, निदर्शने, मोर्चा अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करू, अन्यथा समाजाची ताकद त्या निवडणुकीत दाखवून देण्यात येईल, असा इशाराही यावेळी मिरजकर यांनी दिला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी- पाटील, डॉ. रवींद्र आरळी, प्रदीप वाले, नगरसेवक राजेंद्र कुंभार, मनोहर कुरणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.आरळी यांच्याकडे नेतृत्वडॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे समाजाचे नेतृत्व लिंगायत समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी जतमधील डॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे समाजाचे नेतृत्व देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. समाजाची ताकद ही महत्वाचे आहे. मात्र स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात चालढकल केली जात असल्याचे स्पष्ट झाले. आहे. मात्र संपूर्ण समाज एकत्र करून समाजाची ताकद दाखवून देण्यात येईल, असेही डॉ आरळी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाSangliसांगली