लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणला; तसा बसल व्यवसायातही झाला आहे. दिघंची (ता. आटपाडी) येथील चहा विक्रेते संतोष चव्हाण यांनीही आपल्या थांबलल्या व्यवसायाला नव्या कल्पनेने एक्स्प्रेसची गती दिली आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून विविध प्रकारचा चहा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.
कोरानापासून संभाजी चव्हाण यांचा चहाचा गाडा बंद आहे. सध्या ते चहा घरीच बनवून दुकानात पोहोच करीत आहेत. त्यांच्याकडे एकूण नऊ प्रकारचे चहा मिळत आहेत. त्यात काढ्याला अधिक मागणी आहे. संभाजी चव्हाण हे बँका, हॉस्पिटल, ई-सेवा केंद्रे, पतसंस्था यासह अनेक ठिकाणी चहा पोहोच करत आहेत.
संभाजी चव्हाण यांनी दुकानदारीचा व्यवसाय बंद करून चहाचा व्यवसाय सुरू केला आहे.
दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ते चहा पोहोच करीत आहेत. चहा, कॉफी, बुस्ट, कोरा चहा, बिगर साखर चहा, लेमन टी, दूध व सेंद्रिय गुळाचा चहा असे विविध प्रकारचे चहा ते ग्राहकांना जागेवर पोहोच करीत आहेत. प्रति दिवस ६०० ते ७०० कप चहा ते जागेवर जाऊन विक्री करीत आहेत. दिघंचीत त्यांच्या चहाला चांगलीच मागणी आहे. त्याच्या गाडीवर सुद्धा चव्हाण चहा एक्स्प्रेस असे लिहलेले आहे.
चौकट
गेल्या चार वर्षांपासून दिघंचीत चहाचा गाडा होता. कोरोनापासून चहाचा गाडा बंद आहे. सध्या मी घरीच चहा बनवून दुकानात जाऊन विक्री करीत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सध्या मी काढा विकत आहे.
- संभाजी चव्हाण चहा विक्रते दिघंची.
फोटो-१७दिघंची१
फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे चहा विक्रेते संभाजी चव्हाण यांनी दुचाकीवरून फिरून चहा विक्री करत आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.