शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला दमदाटी केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 13:03 IST

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेत अडथळा आणून पथकाला दमदाटी केल्याप्रकरणी स्वाभिमानी विकास आघाडीच्या एका नगरसेवकाचे पद धोक्यात आले आहे. तर नगरसेविका पतीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेत अडथळा आणून पथकाला दमदाटी केल्याप्रकरणी स्वाभिमानी विकास आघाडीच्या एका नगरसेवकाचे पद धोक्यात आले आहे. तर नगरसेविका पतीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे या दोघांचे धाबे दणाणले असून आयुक्तांना याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहेत. याचा खुलासा आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

महापालिकेने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड, बालाजी चौक, झाशी चौक ते मारुती चौक या परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, आयुक्त रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बैठकीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यावर चर्चा झाली होती. वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अतुल निकम यांनी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांचा सर्व्हेही केला होता. रस्त्यावर हातगाडी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते अशा 240 जणांचे अतिक्रमण असल्याचे आढळून आले होते. पण दिवाळीचा सण तोंडावर असल्याने महापालिका व पोलिसांने त्यांच्यावर कारवाई टाळली होती.  महापालिका व वाहतूक शाखेने बुधवारी संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर हातोडा टाकला.

झाशी चौकापासून या मोहीमेला सुरूवात झाली. बालाजी चौक, मेन रोड व मारुती रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या कडेला बसणारे फळ विक्रेते गायब झाले होते, तर दुकानदारांनी रस्त्यावर थाटलेले मंडप काढून घेतले. त्यामुळे हा रस्ता ब-याच वर्षानंतर वाहतुकीला सुस्थितीत झाला होता. त्यानंतर महापालिकेचे पथक मारुती चौकात आले असता, तिथे मात्र स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब गोंधळे व नगरसेविकापती हेमंत खंडागळे यांनी या मोहिमेला ब्रेक लावला. त्यांनी पथकाशी वाद घालून जप्त केलेले साहित्यही परत करण्यास भाग पाडले होते. 

या प्रकाराची आयुक्त खेबूडकर यांनी गुरुवारी गंभीर दखल घेतली. अतिक्रमण पथकासोबत बैठक घेऊन बुधवारी घडलेल्या प्रकराची त्यांनी माहिती घेतली. सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील यांना वादावादीबाबत लेखी टिपणी देण्याचे आदेश दिले. अतिक्रमण काढताना अडथळा करणा-यांवर काय कारवाई करता येईल, याबाबत त्यांनी महापालिकेचे कायदे सल्लागार अ‍ॅड. सुशील मेहता व उपायुक्त सुनील पवार यांच्याशीही चर्चा केली.  पत्रकारांशी बोलताना खेबूडकर म्हणाले की, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करुन व्यवसाय करणे गैरच आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. त्यासाठीच टप्पा-टप्प्याने रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणार आहोत. त्याचा एक भाग म्हणून मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. सांगली व मिरजेचे उपायुक्त व चारही सहाय्यक आयुक्तांवर अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी सोपविली आहे. बुधवारी लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण हटविताना अडथळा आणला. त्यांचे कृत्य चुकीचेच आहे. त्याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल. महापालिकेकडून केवळ मोहीम आखण्यावरच भर राहणार नाही, तर विक्रेत्यांचे पुनर्वसनही केले जाईल. त्यासाठी आम्ही नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.