शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

लाडेगावचा ‘चंदूभाई एमबीबीएस’

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत : दारू सोडविण्याचा धंदा बारा वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरु--आॅन द स्पॉट रिपोर्टिंग

युनूस शेख - इस्लामपूर--शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत. वैद्यकीय पदवी आणि परवान्याचा प्रश्नच नाही. फक्त वडिलांचा व्यवसाय म्हणून वारसा हक्काने सुरु असलेला हा दारू सोडविण्याचा धंदा गेल्या १0-१२ वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरु होता. मात्र आटपाडीजवळच्या घरनिकीमधील एकाचा बळी गेला अन् वाळवा तालुक्यातील लाडेगाव फाट्याजवळ सुरू असलेला हा प्रकार उजेडात आला. जंगलातील झाडपाला आणि बावडेकरांची आयुर्वेदिक भुकटी देऊन दारू सोडविण्याच्या या गोरखधंद्याची कथा डोळे पांढरे करायला लावणारी आहे.चंद्रकांत जिनू नाईक-मदने (वय ५५, रा. लाडेगाव, ता. वाळवा) असे या तथाकथित, अघोषित वैदूचे नाव. लाडेगाव फाट्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या डाव्या बाजूला ५ ते ६ गुंठे जागेतील घर. वाहने लावायला ऐसपैस जागा. मुख्य रस्त्यावरुन दोन वळणे घेत आत गेले की, बाहेर कशाचाही मागमूस रहात नाही, अशी इथली व्यवस्था. ना इथे औषध देण्यासंबंधीचा फलक, ना की जाहिरातबाजी. तरी प्रसिध्दी मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यापर्यंत पसरलेली. पण दारू सोडविण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणून झालेली अख्यायिका एका रात्रीत दंतकथा बनून गेली.चंद्रकांत नाईक यांचे वडील जिनू नाईक यांचा हा पारंपरिक व्यवसाय. सांधेदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, पित्त, मूळव्याध, दारूचे व्यसन अशा नानाविध विकारांवर आपल्या बटव्यातून मिळेल तो झाडपाला देऊन रुग्णाला विकारापासून मुक्ती द्यायची, हा त्यांचा नामी फंडा. बाहेरवसा उतरवणे, तंत्र-मंत्राने दोरा देऊन येणाऱ्या प्रत्येकाला व्याधिमुक्त करण्यात त्यांचा हातखंडा होता, अशी या परिसरातील ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती. त्यांच्या निधनानंतर हा वारसा चंद्रकांत नाईक यांनी पुढे सुरु ठेवला आहे.एकूणच वैद्यकीय विश्वाला आव्हान देणारा आणि माणसांची डोकी सुन्न करणारा नाईक यांचा हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु होता. प्रत्येकाकडून २५० रुपयांची आकारणी, त्याची वहीमध्ये नोंद. त्यानंतर औषध देणे, अशी त्यांची पध्दत. पोलिसांनी काल रात्री तेथे छापा मारुन नाईकांचे सगळे रेकॉर्ड, झाडपाला, आयुर्वेदिक गोळ्या, भुकट्या आदी ताब्यात घेतले. त्यांच्या दफ्तरात दारू सोडवणे, मूळव्याध अशा व्याधींवर औषध घेतलेल्या ५0 ते ६0 पोलिसांचीही नावे आहेत. नाईकांच्या या व्यवसायाबाबत तक्रार नसल्याने सगळाच मामला खुशीचा असल्याने, कारवाईचा प्रश्न आला नाही.एखाद्या पदवीप्राप्त डॉक्टरचा व्यवसाय फिका पडेल, अशी चंद्रकांत नाईकांची ख्याती होती. रोज किमान २0 ते २५ व्यक्ती दारू सोडविण्याचे औषध घेऊन जात होत्या. म्हणजे नाईकांची रोजची मिळकत किमान ५ ते ७ हजारांची होती. नाईकांचे दारू सोडवायचे औषधही दारूच्या बाटलीतूनच दिले जायचे. (कारण काय, तर औषध घेणाऱ्याला ती दारुच आहे असे वाटावे.) हे औषध घेतले की उलट्या होतात. त्यातून शरीरातील अल्कोहोल बाहेर पडते. पोटाचा कोटा साफ होतो आणि त्यानंतर त्या माणसाला दारू पिण्याची इच्छा होत नाही, हा या धंद्याचा साधा सरळ सिध्दांत. नाईक सांधेदुखीवरही विविध प्रकारचे तेलही देतात अन् स्वत: मसाजही करतात. आतापर्यंत त्यांच्या या धंद्याविषयी कधी तक्रार आली नाही. मात्र काल घरनिकीच्या एकाचा बळी गेला अन् ८ जण तडफडले. त्यातून मग या गोरखधंद्याची चाहूल पोलिसांना लागली. घटनेचे गांभीर्य आणि मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनाचा धसका घेत पोलिसांनी रातोरात चंद्रकांत नाईकांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.आम्ही काय खून तर केला नाय..!ही घटना घडल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने थेट घटनास्थळाला भेट देत नाईक कुटुंबियांशी चर्चा केली. त्यावेळी ते निर्विकारपणे बोलत होते. वडिलांपासून हा व्यवसाय सुरु आहे. आता मुलगा चालवतोय. कधी कुणाची तक्रार नाही. मात्र कालच्या घटनेत जाणारा त्याच्या कर्माने गेला. मात्र फळाला आमच्या आलं. आमच्याकडे व्यवसायाचा परवाना नाही, एवढीच आमची चूक होईल. त्रास जरा आता सोसायचा. नाही तर आम्ही काय खून केलाय का? अशा शब्दात नाईक कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.माणसं तशी साधी, सरळ..!हा व्यवसाय करताना आपण काही चुकीचे करतोय, याचा लवलेशही या कुटुंबाला नाही. शिक्षणच जेमतेम असल्याने कायद्याबाबत काही माहितीच नाही. वडिलांचाच व्यवसाय करतोय, कित्येक जणांना त्याचा लाभ होतोय, हीच या कुटुंबाची साधी भावना. मात्र लक्ष्मण मानेंच्या मृत्यूने त्यांच्या या व्यवसायावरच बालंट आले. चंद्रकांत नाईक याला अटक केल्याची बातमी थडकताच आज सकाळपासून ग्रामस्थांनी तेथे रीघ लावली होती. प्रत्येकजण विचारपूस करीत होता. त्यामुळे घटनेचे गांभीर्य त्यांना जाणवलेच नव्हते.२५0 रुपयांत मरण..!चंद्रकांत नाईक याचा दारू सोडविण्यावर औषध म्हणून झाडपाला आणि आयुर्वेदिक गोळ्या, भुकटी देण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याच्या व्यवसायाची व्याप्ती अन् प्रसिध्दीही मोठी होती. मात्र लक्ष्मण माने यांच्या मृत्यूने त्याच्या व्यवसायाची धूळदाण उडाली. दारु सोडण्याच्या इच्छेने आलेल्या लक्ष्मण माने याच्या वाट्याला मात्र केवळ २५0 रुपयांत मरण आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच नाईकांचा व्यवसायही अडचणीत आला.