उमदी : उमदी (ता. जत) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नाप्पाण्णा होर्तीकर (वकील) यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्शवभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी होर्तीकर (वकील) हे शुक्रवारी राष्ट्रवादी कार्यालय व सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात दिवसभर थांबूनच होते. कार्यकर्त्यांनीही गर्दी होऊ न देता आपल्या नेत्याला शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री जयंत पाटील, युवक नेते प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, सुरेश शिंदे, रमेश पाटील, उमेश सावंत, प्रकाश जमदाडे, निलेश बामणे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. उमदीच्या प्रथम नागरिक सरपंच वर्षा शिंदे, त्यांचे पती निवृत्ती शिंदे, उपसरपंच कलावती तोरणे, फिरोज मुल्ला, रवी शिवपुरे, डॉ. रवींद्र हत्तली, आर. एस. पाटील, राघवेंद्र बिजरंगी, अरविंद सौदी, गणेश शेवाळे, रमेश खरोशी, सचिन होर्तीकर, श्रीशैल मालापुरे, विष्णू पवार, मलकारी रवी, निंगराज बिराजदार, के. जी. नंदूर, सोनलगीचे राजू पाटील व प्रकाश चव्हाण, योगेश वाघदरी, इस्माईल सय्यद, सचिन संकपाळ, सोना सय्यद, अबू मुल्ला, कबीर अत्तार, वहाब मुल्ला आदींसह अनेक मान्यवरांनी हाेर्तीकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.