शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भोसेत काँग्रेससमोर अस्तित्वाचे आव्हान

By admin | Updated: January 9, 2017 22:59 IST

जिल्ह्याच्या राजकारणाचे पडसाद उमटणार : आरक्षणामुळे प्रस्थापितांचा घरातील अथवा समर्थक महिलांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न

अण्णा खोत ल्ल मालगावमिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गट खुल्या गटातील महिलांसाठी व सोनी पंचायत समिती गण इतर मागास पुरुष प्रवर्गासाठी, तर भोसे गण मागासवर्गीय पुरुषासाठी राखीव झाला आहे. यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित असल्याने स्थानिक नेत्यांचे घरातील अथवा समर्थक महिलांना निवडणुकीत उतरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशा तिरंगी लढतीचे संकेत असले तरी, बदलत्या राजकीय घडामोडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची राष्ट्रवादीशी जवळीक व काँग्रेसमधील गटांतर्गत वाद यामुळे काँग्रेसला अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. येथे काँग्रेसप्रणित मदन पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे गट सक्रिय आहेत. पूर्वी येथे घोरपडेप्रणित विकास आघाडीचे वातावरण होते. सोनी गावातही घोरपडे गटाचे वर्चस्व होते. मात्र बाजार समितीचे संचालक दिनकर पाटील यांनी घोरपडे यांच्याशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे वसंतदादा घराण्याच्या गटांना बळ मिळाले. सध्या घोरपडे गटाची धुरा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र माळी यांच्याकडे आहे. मागीलवेळी काँग्रेस व राष्ट्रवादीत काट्याची टक्कर झाली. सोनी व भोसे गणांतून काँग्रेसचे माजी सभापती सुभाष पाटील व अलका ढोबळे विजयी झाले. काँग्रेसने दोन्ही गण जिंकले, मात्र राष्ट्रवादीचे राजेंद्र माळी यांनी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचा पराभव केला होता. आता घोरपडे घोरपडे भाजपमध्ये असले तरी, खा. संजय पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही. बाजार समितीच्या सभापती निवडीवरुन माजी मंत्री पतंगराव कदम व मदन पाटील गटही त्यांच्यापासून दुरावला आहे. त्यांनी उघड भूमिका स्पष्ट केली नसली तरी, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व ते एकत्रित विकास कामांचे नारळ फोडू लागल्याने, घोरपडे पुन्हा राष्ट्रवादीला साथ देण्याची शक्यता आहे. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. घोरपडे गट व राष्ट्रवादीने स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतल्यास, त्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. बाजार समितीच्या सभापती निवडीत पतंगराव कदम व मदन पाटील गटाने घोरपडे व विशाल पाटील यांना डावलले. त्याचे पडसाद पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत उमटले. कदम व पाटील गटाने दिनकर पाटील यांचे समर्थक चार्ली ढोबळे यांच्या पत्नी अलका ढोबळे यांचे उपसभापती पदासाठी सुचविलेले नाव डावलून घोरपडे व विशाल पाटील गटाने म्हैसाळच्या जयश्री कबुरे यांना उपसभापती केले. हीच रणनीती पुढे दिसणार आहे. भोसे गट महिलांसाठी राखीव असल्याने नेत्यांनी पत्नी अथवा समर्थक महिलांसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सोनीतून बाजार समितीचे संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील, माजी उपसरपंच प्रमिला चव्हाण, आसावरी मुळीक, भोसेतून वैशाली मनोज पाटील, अनिता कदम, कमल पाटील, मीनाक्षी शीतल पाटील, निर्मला उत्तम हराळे यांची नावे चर्चेत आहेत. सोनीचे वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक राहुल पाटील यांनी घरात उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत. भोसे पंचायत समिती गण मागासवर्गीय पुरुषासाठी राखीव असल्याने कळंबीचे राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, भोसेतील कृष्णा कांबळे, अरुण कांबळे व सिध्देवाडीचे सुरेश कुरणे यांची नावे चर्चेत आहेत. सोनी गण इतर मागास पुरुषासाठी (ओबीसी) राखीव आहे. येथे सोनीचे रिंगराव जाधव, शिवसेनेचे सुरेश नरुटे, विजय गुरव इच्छुक आहेत. पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, महावीर खोत, मोहन खरात, विकास कदम, मनोज पाटील, शीतल पाटील, नेमिनाथ चौगुले, सोनीचे राहुल पाटील यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.