शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 भाजप-‘स्वाभिमानी’समोर वंचित आघाडीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:20 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून २००९ ला सांगली मतदारसंघात समाविष्ट झालेल्या खानापूर विधानसभा ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून २००९ ला सांगली मतदारसंघात समाविष्ट झालेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे, तर कॉँग्रेस-राष्टÑवादी व स्वाभिमानी आघाडीचे विशाल पाटील यांची ‘बॅट’ही मतदारसंघात फिरत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीने खानापूर मतदारसंघात आव्हान उभे केले आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांचा मोठा गट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आ. बाबर कॉँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्या प्रचारात उतरले होते. आता भाजप-शिवसेना युती असल्याने युतीधर्म पाळून यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांच्या पाठीशी फौज उभी केली आहे. त्यातच आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांनीही खा. पाटील गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडळकर यांनी भाजप व स्वाभिमानीसमोर आव्हान उभे केले आहे. आटपाडी, खानापूर या दोन तालुक्यात पडळकर समर्थक संख्या उल्लेखनीय आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत हातात कमळ घेतलेले कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे काही कार्यकर्ते आणि राष्टÑवादीचे सर्व कार्यकर्ते आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत. सदाशिवराव पाटील यांच्या संपूर्ण गटाचा निवडणुकीविषयीचा निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे. गेल्या सहा महिन्यात याठिकाणची समीकरणे गतीने बदलली आहेत. राजकीय शत्रुत्वाच्या जागी मैत्री आणि मैत्रीच्या जागी रुसवा, असे बदलते रंग या विधानसभा मतदारसंघात दिसत आहेत. त्याचे या निवडणुकीवर काय परिणाम होणार, याची चर्चाही येथील नागरिकांत रंगली आहे.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?भाजप-शिवसेना युतीमुळे आ. अनिल बाबर यांची ताकद भाजप उमेदवाराला मिळाली आहे. त्यातच आटपाडीचे शिवसेना नेते तानाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. खासदारांचा विट्यातील गटही सक्रिय झाला आहे.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?यशवंत कारखान्यामुळे खासदार पाटील व आ. बाबर गटात वाद होता. तो आता मिटल्यामुळे काही महिन्यापूर्वी खासदारांसोबत असलेला माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गट भाजपपासून दुरावला आहे.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?संजयकाका व पडळकर यांच्यातील मैत्रीची जागा संघर्षाने घेतल्याने भाजपची मतविभागणी होण्याची चिन्हे आहेत. त्यातच सदाशिवराव पाटील गटाच्या मदतीचा फायदा विटा शहरासह मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ला होणार आहे.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?या मतदारसंघात कॉँग्रेसमध्ये गटबाजी आहे. माजी आ. सदाशिवराव पाटील व कदम कॉँग्रेसचा वाद आजही चर्चेत आहे. त्यामुळे सदाशिवराव पाटील समर्थक गटाने भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ मध्ये झालेल्या खानापूर-आटपाडी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनिल बाबर यांना ७२,८४९ मते, तर कॉँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांना ५३,०५२ मते मिळाली. १९,७९७ मतांनी बाबर निवडून आले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक