शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Lok Sabha Election ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीने भाजपसमोर तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:22 IST

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : गत लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात भाजपने मिरज तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : गत लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात भाजपने मिरज तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. मात्र यावेळी खा. संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील यांच्यातील लढतीमुळे समीकरणे बदलली आहेत. गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविणाऱ्या भाजपला पुन्हा मताधिक्य मिळविण्याचे आव्हान आहे.गत लोकसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघात मिरज पूर्व भाग व शहरातही भाजपने मताधिक्य मिळवून काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. मिरज पूर्व भागात आ. सुरेश खाडे यांच्या विरोधातील माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांच्याशी जवळीक केली. आताच्या निवडणुकीत ही मंडळी विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची नाराजी दूर झाल्याने विकास आघाडीचे कार्यकर्ते खा. पाटील यांच्या प्रचारात आहेत. मात्र घोरपडे गट खा. पाटील यांना कितपत मदत करणार, हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका असल्याने आ. सुरेश खाडे यांचाही खासदारांसोबत छुपा संघर्ष संपुष्टात आला आहे. मात्र आ. खाडे समर्थक काय भूमिका घेतात, यावरच भाजपचे मताधिक्य अवलंबून आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी मिळाल्यामुळे विशाल पाटील यांना पूर्व भागातील व नदीकाठच्या ऊस उत्पादकांचा पाठिंबा मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचे लक्ष धनगर समाज, दलित व मुस्लिम मतांवर आहे. मिरजेत मोठ्या संख्येने असलेले मुस्लिम मतदार स्वाभिमानी आघाडीकडे असल्याने, दलित व मुस्लिम मतांचे विभाजन होणार आहे. मत विभाजनामुळे खा. पाटील यांना यावेळी मताधिक्य मिळविणे कठीण असल्याचे चित्र आहे.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना ९३,७९५ हजार व काँग्रेसचे प्रा. सिध्दार्थ जाधव यांना २९,७२८ हजार मते मिळाली होती. ६४ हजार ६७ मतांनी खाडे यांना विजय मिळाला होता.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?मिरजेत भाजपचे आमदार व सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मतभेद आहेत. शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. काँग्रेस, राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना पदे मिळाली असल्याने, जुने भाजप कार्यकर्ते उपेक्षित आहेत.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?गेल्या पाच वर्षात पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. गेल्या दहा वर्षात भाजप-सेना युतीच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?मिरज विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शहरात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेस व राष्टÑवादीची एकत्रित ताकद स्वाभिमानीसाठी फायद्याची आहे.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?मिरज राखीव विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण आहे. काँग्रेस व राष्टÑवादीत समन्वयाचा अभाव आहे. पक्षाच्या नेत्यांविरोधात कामाची मिरज पॅटर्नची परंपरा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक