शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या संपत्तीवर केंद्र सरकारचा दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

सांगलीतील स्टेशन चौकात दिल्लीत सुरू असलेल्या किसान बाग आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे शनिवारी सभा झाली. यावेळी माजी ...

सांगलीतील स्टेशन चौकात दिल्लीत सुरू असलेल्या किसान बाग आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे शनिवारी सभा झाली. यावेळी माजी खा. शेट्टी बोलत होते. यावेळी प्रा. बाबूराव गुरव, ॲड. सुभाष पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आय्याज नायकवडी, सदाशिव मगदूम, ॲड. के. डी. शिंदे, कॉ. उमेश देशमुख, विकास मगदूम, शंकर पुजारी, प्रा. सुभाष दगडे, राजू कांबळे, संदीप कांबळे, शिवसेनेचे बजरंग कदम, शंभूराज काटकर, आदी उपस्थित आहे.

राजू शेट्टी म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधानांना अनेक पत्र लिहिली, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दिल्लीत थंडीमध्ये कुडकुडत बसलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार चुकीची वागणूक देत आहे. या पाषाणहृदयी सरकारला शेतकऱ्यांची दया आली नाही. केंद्रानं कुठलाही शेतकरी, कुठल्याही शेतकरी संघटनेसोबत चर्चा केली नाही. मग हे कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला? असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, केंद्र सरकार उद्योगपतींना विकले गेले आहे. हे कायदे उद्योगपतींना शेतकऱ्यांना लुटता यावं म्हणून केले गेले आहेत. हे सगळेजण हस्तक म्हणून काम करत आहेत. शेतकरी आणि सरकारी मालमत्तांवर केंद्र सरकार उद्योगपतींच्या माध्यमातून दरोडा टाकत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

समन्वय समितीचे महेश खराडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. संजय पाटील यांनी सभेत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधातील ठराव मांडले, त्यास सर्वांनी पाठिंबा दिला.

चौकट

शेतकरी, कष्टकऱ्यांचा हक्क नाकारण्याचा प्रकार : बाबूराव गुरव

डॉ. प्रा. बाबूराव गुरव म्हणाले, केंद्र सरकारने केलेला कायदा हा केवळ शेतकऱ्यांच्या विरोधातील नसून १३० कोटी भारतीयांच्या विरोधातील आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव येणार आहे. खासगीकरणातून विकास अशा पद्धतीचा कारभार चालू आहे. कायद्यात सुधारणा करून गरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा हक्क नाकारण्याचा प्रकार सुरू आहे.