शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केंद्राने साखर कारखान्यांना अनुदान द्यावे

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

वैभव नायकवडी : हुतात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

वाळवा : यावर्षी साखरेचे दर गडगडल्याने ‘हुतात्मा’ला सुध्दा शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देणे अडचणीचे झाले आहे. त्यासाठी शासनाने अनुदानाचा निर्णय ताबडतोब घ्यावा. तसेच एफआरपीप्रमाणेच साखरेचे दरसुध्दा शाश्वतस्वरूपी अंतर्भूत करावेत, असे प्रतिपादन अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३२ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी नायकवडी बोलत होते.यावेळी माजी अध्यक्ष महादेव कांबळे, श्रीमती नीलावती माळी, उपाध्यक्षा सौ. वंदना माने, संचालिका सौ. सुनीता माळी उपस्थित होते. नायकवडी म्हणाले की, सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल २६00 रुपये आहेत. बँका कारखान्यांना मार्केटमधील साखरेच्या दरावर ८५ टक्केच उचल देतात. त्यात कारखान्यांना तोडणी, ओढणी व कामगार पगार आणि इतर खर्च देऊनच शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा लागतो. सहकारमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी, केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन साखर धंदा टिकण्यासाठी व शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळण्यासाठी प्रयत्न करून निर्णय घ्यावा. हा निर्णय तात्पुरता मलमपट्टीचा असू नये. कायमस्वरुपी जखम बरी होईल, असाच निर्णय असावा.यावर्षी कारखाना मे २0१५ अखेर सुरू राहील. ७ लाख मेट्रिक टन गाळप व १३.५0 टक्के सरासरी रिकव्हरी घेण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने निश्चित केले आहे, असेही ते म्हणाले.प्रारंभी कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस यांनी स्वागत केले. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. काटा पूजन उपाध्यक्षा सौ. वंदना माने व माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी केले. (वार्ताहर)