कामेरी येथे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. इंद्रजित मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. अनिल पाटील भगवान कदम, विलास बारपटे, केंद्र संयोजक प्रा. संजय पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्था अभ्यास केंद्रात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्रुकचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी कर्मवीर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. अनिल पाटील, संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम, उपाध्यक्ष विलास बारपटे, केंद्र संयोजक प्रा. संजय पाटील, प्रा. सुधीर खंडागळे, केंद्रसहायक अतुल कदम, संस्थेचे संचालक अशोक निळकंठ, एस. आर. पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक हंबीरराव जेडगे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शैला पाटील, वैभव पाटील, महेश पाटील, अच्युत लोहार उपस्थित होते.