शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शंभराव्या नाट्य संमेलनाची ५ नोव्हेंबरला सांगलीत मुहूर्तमेढ; मोटायसायकल रॅली, नाट्यप्रयोगाचे आयोजन

By अविनाश कोळी | Updated: October 25, 2023 13:06 IST

सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ येत्या ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत करण्यात येणार आहे. ...

सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ येत्या ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत करण्यात येणार आहे. राज्यातील नामांकित रंगकर्मींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रभर विविध उपक्रमांनी शंभरावे नाट्य संमेलन साजरे केले जाणार आहे. नाट्यपंढरी सांगलीत त्याची मुहूर्तमेढ होईल. सकाळी नऊ ते दहा या वेळेत सांगलीत मोटारसायकल दींडीचे आयोजन केले आहे. यावेळी गोविंद बल्लाळ देवल यांचे पोलिसप्रमुखांच्या कार्यालयासमोरील घर, मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह, सांगलीवाडी येथील काकासाहेब खाडिलकर यांचे दत्त मंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह तसेच विष्णुदास भावे यांचा गावभागातील भावेवाडा या सर्व नाट्य चळवळीच्या उगमाच्या श्रद्धास्थानातून संहिता सांगलीच्या गणपती मंदिरापर्यंत आणण्यात येतील. तिथून नाट्यदिंडी वाजत गाजत भावे नाट्य मंदिरात येईल. संहितांचे विष्णुदास भावे नाट्यगृहात विष्णुदासांच्या पुतळ्यासमोर पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले व अन्य मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व नांदीने मुहूर्तमेढ रोवण्यात येईल.लेखक राजेंद्र पोळ यांच्या दहा नाट्यविषयक संहिता व गितांजली ठाकरे यांच्या ‘दऊत लेखणी’ या नाट्यविषयक विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येईल. सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यवाह अजित भुरे, सतील लटके, संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गजवी, संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, शशी प्रभू, अशोक हांडे उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी ४ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता भावे नाट्यमंदिरात ‘चाणक्य’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. पत्रकार परिषदेस गाडगीळ यांच्यासह उद्योजक गिरीश चितळे, भाऊसाहेब भोईर, प्रा. वैजनाथ महाजन, गिरीश महाजन, अंजली भिडे, चंद्रकांत धामणीकर, मुकुंद पटवर्धन, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

विभागीय संमेलनाचे आयोजनराज्यभरात विभागीय संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे नियोजन सध्या सुरु आहे, अशी माहिती भोईर यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Sangliसांगली