शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत चिंब उत्साहात रंगपंचमी साजरी

By admin | Updated: March 17, 2017 23:32 IST

रंगांची मनसोक्त उधळण : कोरड्या रंगपंचमीला प्राधान्य, तरुणाईचा जल्लोष; रस्ते रंगाने माखून गेले

सांगली : उन्हाचा चढत चाललेला पारा आणि त्यासोबतीला रंगांची उधळण करत शुक्रवारी शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महाविद्यालय परिसरात तसेच प्रत्येक तरुण-तरुणींचा मोठा उत्साह दिसून येत होता. दरम्यान, जिल्ह्यासह शहरात असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात बहुतांश ठिकाणी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. होळीनंतर आठवडाभरातच आलेल्या रंगपंचमीला रंगांची उधळण करण्याची संधी शहरवासीयांना मिळाली. आपल्याकडे होळीला रंग खेळला जात नसल्याने सर्वांना रंगपंचमीची प्रतीक्षा होती. सकाळपासूनच शहरात रंगपंचमीला सुरुवात झाली. यंदा रंगांच्या उधळणीबरोबर पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यात आला असला तरी, कोरड्या रंगांची अक्षरश: पोती घेऊन तरुण रस्त्यावर फिरताना दिसत होते. परिचिताला गाठून त्याला रंग लावण्यात येत होता. रंगांच्या उधळणीबरोबरच शहरातून मोटारसायकलवरून रपेट मारत अनेकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. मात्र, पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केल्याने मर्यादित स्वरुपात तरुणांनी हुल्लडबाजी केली. शहरात रंगपंचमीचा खरा उत्साह महाविद्यालय परिसरात दिसून आला. शहरातील सर्वच महाविद्यालयांचे रस्ते अक्षरश: रंगाने माखून गेले होते. रंगांची उधळण करण्यात मुलीही आघाडीवर होत्या. युवतींचे अनेक गटही वाहनांवरून रंगांची उधळण करीत फिरताना दिसत होते. दुपारनंतर रस्ते ओस पडले असले तरी, सायंकाळी पुन्हा रंगांच्या उधळणीला जोर आला होता. सकाळपासून लहान मुले रंगाची उधळण करीत होते. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट होता. तरीही तरुण दुचाकीवरुन रंगाची उधळण करताना दिसत होते. शहरातील अनेक दुकाने बंद होती. सायंकाळनंतर ती सुरु झाली. पण पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. (प्रतिनिधी)