शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सांगली जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी : मुस्लिम बांधवांची केरळमधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:24 IST

शहरात बुधवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सामुदायिक नमाज पठणानंतर एकमेकांनी गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. केरळमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्ती निवारणार्थ

ठळक मुद्देनमाज पठण

सांगली : शहरात बुधवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सामुदायिक नमाज पठणानंतर एकमेकांनी गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. केरळमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्ती निवारणार्थ मुस्लिम बांधवांनी प्रार्थना करत मदतही संकलित केली. दिवसभर शहरात ईदचा उत्साह कायम होता.बुधवारी सकाळपासूनच जुन्या बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची गर्दी होऊ लागली होती. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. या प्रार्थनेवेळी लहान मुलांचाही सहभाग लक्षणीय होता. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज अदा केल्यानंतर विश्वशांतीसाठी, बंधूभाव जोपासण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी प्रशासकीय व इतर सामाजिक, राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनीही उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या आठवड्यापासून केरळमध्ये महापुरामुळे नैसर्गिक संकट निर्माण झाले आहे. पुरामुळे केरळचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना या संकटातून बाहेर काढावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. केरळवासीयांसाठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली तसेच काही सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने मदतनिधीही संकलित करण्यात आला.

जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, कॉँग्रेसचे नेते विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण, उत्तम साखळकर, राजेश नाईक यांच्यासह ईदगाह कमिटीचे पदाधिकारी, विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मिरज : मिरजेत बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण केले. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी महापौर संगीता खोत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

महंमद बुºहानुद्दीन खतीब यांनी खुदबापठण व मौलाना मिजाज मुश्रीफ यांनी नमाजपठण केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अनिकेत भारती, पृथ्वीराज पाटील, समित कदम, संतोष कोळी, नंदू कदम, राजू खोत, अमोल सातपुते, विजय पाटगावकर, प्रमोद इनामदार, नगरसेवक संदीप आवटी, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, गजेंद्र कुळ्ळोळी, शीतल पाटोळे, मनोहर कुरणे यांनी शुभेच्छा दिल्या.महापौर संगीता खोत यांचा ईदगाह ट्रस्टतर्फे जैलाब शेख यांनी सत्कार केला. याप्रसंगी अमीरहमजा सतारमेकर, महेबूबअली मणेर, मुस्तफा बुजरूक, बुºहान खतीब, गुलाम शेख, शकील शेख उपस्थित होते.कडेगाव तालुक्यात नमाज पठणकडेगाव तालुक्यात बकरी ईद उत्साहाने साजरी झाली. यानिमित्ताने कडेगाव येथे नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी केरळ पूरग्रस्तांसाठी तसेच सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना केली. कडेगाव, कडेपूर, शाळगाव, वांगी, अमरापूर, देवराष्टेÑ, चिंचणी, नेर्ली, तडसर आदी गावांमध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहाने साजरी केली. कडेगाव येथे मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन कडेगाव सुन्नी शाही जामा मशिदीचे पेश इमाम मुफ्ती निसार अहमद कादरी यांच्या उपस्थितीत नमाजपठण केले. यावेळी आ. मोहनराव कदम, आ. डॉ. विश्वजित कदम, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शांतारामबापू कदम, जितेश कदम, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सांगली येथे नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात येत होते.सांगलीत बुधवारी बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. दुसरे छायाचित्र मिरजेतील सामुदायिक नमाज पठणाचे.

टॅग्स :SangliसांगलीKerala Floodsकेरळ पूरMuslimमुस्लीम