ही बातमी ८ बाय ८ घेणे
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था संचलित नूतन मेडिकल कॅम्पसमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजन केले होते. कवियत्री प्रा. सुरेखा कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड उपस्थित होत्या.
दीपाली गायकवाड यांनी उपस्थित मुलींना सायबर गुन्हे आणि आपली वर्तणूक याबाबत माहिती दिली. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. नूतन माळी, सचिव डॉ. रामलिंग यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे संचालक प्रा.संजय दळवी, होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाजीराव शिंदे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल पाटील, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरणकुमार वड्डी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. आरिफ शेख आदी उपस्थित होते.