फोटो ओळ : प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य विनायक शिंदे यांचा ४९ वा वाढदिवस ग्रंथतुला करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजीव सावंत, शिवाजीराव शिंदे, लक्ष्मणराव बोराडे उपस्थित होते. शिक्षक संघाकडून वाढदिवसाच्या कार्यक्रमात शिंदे यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी हजाराहून अधिक पुस्तके जमा झाली. ही पुस्तके जिल्ह्यातील माॅडेल शाळेला दिली जाणार आहेत, असे अविनाश गुरव, फत्तू नदाफ, प्रमोद कोडग, सुभाष शिंदे यांनी सांगितले.
यावेळी अपघातात मृत्यू पावलेले शिक्षक कै. एच. के. मुल्ला यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.
कार्यक्रमास डी. बी. शिंदे, पोपटराव सूर्यवंशी, अविनाश गुरव, हंबीरराव पवार, तानाजी खोत, सुधाकर पाटील, संजय दिवे, फत्तेसिंग पाटील, शशिकांत माणगावे, दगडू येवले, शामगोंडा पाटील, बाजीराव पाटील, अशोक पाटील, दिलीप सानप, श्रीकांत पवार, अशोक महिंद, जकप्पा कोकरे, नामदेव भोसले, दिलीप पवार, लखन होनमोरे, केशव घोडके, सुहास कुलकर्णी, बाळासाहेब कटारे, नीतेंद्र जाधव, सलीम मुल्ला, बसवराज यलगार, सुरेश खारकांडे, बंडू यादव, बी. आय. बिरादार, मलकारी होनमोरे उपस्थित होते. देवाप्पा करांडे यांनी स्वागत, तर अविनाश गुरव यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले व फत्तू नदाफ यांनी आभार मानले.