पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील ज्येेेेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी लाड यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, माजी आमदार शरद पाटील, मामासाहेब पवार, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
सकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत औक्षण करण्यात आले. आशासेविकांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या आशा कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून मान्यवरांनी कॅप्टन रामचंद्र लाड यांना शुभेच्छा दिल्या.