शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदलला

By admin | Updated: March 11, 2017 18:03 IST

पंकजा मुंडेंच्या दौऱ्याने नवा संशयकल्लोळ : भ्रूणहत्येच्या वादग्रस्त प्रश्नांवर मौन

ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदललापंकजा मुंडेंच्या दौऱ्याने नवा संशयकल्लोळ : भ्रूणहत्येच्या वादग्रस्तप्रश्नांवर मौनसांगली : म्हैसाळ येथील भ्रूणहत्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांची केलेलीतडकाफडकी बदली, म्हैसाळला भेट न देता सांगलीत पदाधिकाऱ्यांच्या घरीदिलेल्या भेटी, अंतर्गत शासकीय आढावा बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीउपस्थिती, अशा अनेक कारणांनी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचादौरा संशयाच्या भोवऱ्यात सापडला.पंकजा मुंडे यांनी शनिवारी म्हैसाळ येथील भ्रूणहत्याप्रकरणी सांगलीतीलजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री सुभाषदेशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. शिवाजीरावनाईक, आ. सुधीर गाडगीळ, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील,जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व प्रमुखअधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवादसाधला. यावेळी त्या म्हणाल्या की, डॉक्टर असलेल्या महिला पोलिस उपअधीक्षकदीपाली काळे यांची आम्ही चौकशी अधिकारी म्हणून नव्याने नियुक्ती केलीआहे. काळे या डॉक्टर असून महिला अधिकारी म्हणून त्यांचा तपासात अधिकफायदा होऊ शकतो. अत्यंत निंदाजनक आणि समाजासाठी घातक असलेले हे प्रकरणआहे. याचा जितका निषेध करता येईल, तितका थोडा आहे. समाजातीलस्त्रियांबद्दलची चुकीची मानसिकताही या घटनेतून समोर आली आहे. त्यामुळेया घटनेला समाजही तितकाच जबाबदार आहे. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणारनाहीत, याची दक्षता आम्ही घेऊ.यापूर्वी बाबासाहेब खिद्रापुरेविरुद्धच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेलेकिंवा भ्रूणहत्या, गर्भलिंग तपासणी यासारख्या गोष्टींमध्ये बेफिकीरीदाखविण्याऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. याबाबतची चौकशी सुरू आहे.कोण अधिकारी यास जबाबदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्णझाल्यानंतर याची माहिती जाहीर केली जाईल. पोलिसांचा तपास वेगाने व योग्यदिशेने सुरू आहे. त्यामुळे कोणाचीही याप्रकरणी गय केली जाणार नाही, असेत्यांनी स्पष्ट केले.ह्यनो कॉमेंटस्ह्णप्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा सल्लागार समितीच्या अ‍ॅड. अर्चना उबाळेयांना तडकाफडकी दीड वर्षापूर्वी कार्यमुक्त केल्याच्या प्रकरणावर बोलतानामुंडे म्हणाल्या की, संबंधित अधिकाऱ्यांची मुदत संपल्याने त्यांनाकार्यमुक्त केले असावे. एका अधिकाऱ्याच्या जाण्याने काही फरक पडत नाही.तरीही हे पद का रिक्त राहिले तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटीलयांनी कोणता आदेश दिला, याबद्दल मला कोणतीही टिपणी करायची नाही. सध्यानेमण्यात आलेल्या चौकशी समितीतील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनीटिपणी करणार नसल्याचे स्पष्ट केले.आढावा बैठकीला पदाधिकारीजिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय आढावा बैठकीला मुंडे यांच्यासोबतपालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीरावनाईक, आ. सुधीर गाडगीळ, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील,जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह महत्त्वाचे अधिकारीउपस्थित होते. त्यांची उपस्थिती अपेक्षित होती, मात्र भाजपचेजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, नगरसेविकास्वरदा केळकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्तेही बैठकीला उपस्थित राहिल्यानेअनेकांच्या भुवया वर गेल्या. बैठकीनंतर याबद्दल चर्चा रंगली होती.म्हैसाळला भेट नाही...मुंडे व पालकमंत्री देशमुख यांनी भ्रूणहत्या प्रकरणाची आढावा बैठकसांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, मात्र त्यांनी म्हैसाळ (ता.मिरज) गावास भेट दिली नाही. बैठकीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्यानिवासस्थानी त्यांनी भेट दिली. पालकमंत्री देशमुख यांनीही घटनेनंतरएकदाही म्हैसाळला भेट न दिल्याने त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासूनटीका सुरू आहे.मुंडेंनी पाजले उपदेशाचे डोसशासनाने योजना राबविल्याने काही होणार नाही. समाज शहाणा झाला पाहिजे,प्रसारमाध्यमांनी त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे, असे उपदेशाचे डोसशनिवारी पंकजा मुंंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. त्या म्हणाल्याकी, भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत. जनजागृतीमोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचा काही परिणाम होत नाही, अशी टीका योग्यनाही. जोपर्यंत समाज सुधारत नाही, तोपर्यंत योजनांचा परिणाम होणार नाही.त्यामुळे समाजाने शहाणे बनले पाहिजे. गर्भलिंग तपासणी, मुलींविषयीचीभावना याविषयीचे बदल समाजाने स्वत:हून केले पाहिजेत. प्रसारमाध्यमांनी,वृत्तपत्रांनीही प्रबोधनाच्या व चांगल्या बातम्यांकडे लक्ष दिले पाहिजे.प्रत्येकाने त्यांची जबाबदारी ओळखावी. सर्व घटकांनी त्यांचे योगदान दिलेतरच योजना यशस्वी होतील.