शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

युवक राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:58 IST

युवक राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी सेनेने भाजपशी युती केल्यामुळे दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट देऊन त्यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका केली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांनी सूरज चव्हाण यांनी व्यंगचित्र तयार करून प्रेमसहीत ते उद्धव ठाकरेंना पाठविल्याचे एका चित्रफीतीत म्हटले आहे. सोशल मिडियावर हे व्यंगचित्र व व्हिडिओ राष्ट्रवादीने व्हायरल केले आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावरही व्हिडिओ व्हायरलस्वत:च्याच भूमिकेला तिलांजली दिल्याची टीका, शिवसैनिकांबद्दल सहानुभूती व्यक्त

सांगली : युवक राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी सेनेने भाजपशी युती केल्यामुळे दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट देऊन त्यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका केली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांनी सूरज चव्हाण यांनी व्यंगचित्र तयार करून प्रेमसहीत ते उद्धव ठाकरेंना पाठविल्याचे एका चित्रफीतीत म्हटले आहे. सोशल मिडियावर हे व्यंगचित्र व व्हिडिओ राष्ट्रवादीने व्हायरल केले आहे.सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, गेली चार वर्षे शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधाची भूमिका घेतली होती. पुढील निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट करून भाजप नेत्यांवर तसेच राज्यातील कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. शिवसैनिकांनाही तशाच सूचना दिल्या होत्या.

युतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेऊन त्यांच्याच भूमिकेला तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे जे सच्चे शिवसैनिक आहेत, त्यांच्याबद्दल मला व राष्ट्रवादीला सहानुभूती वाटते. उद्धव ठाकरे यांची ही भूमिका दुतोंडी सापासारखी आहे. त्यामुळे त्यांना शोभेल अशी ही व्यंगचित्राची प्रतिमा आम्ही भेट देत आहोत. त्यांनी खुल्या दिलाने ती स्वीकार करावी, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना