सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी पुन्हा वाढ झाली. जिल्ह्यात १०७३ नवीन रुग्ण आढळून आले. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील १५ अशा १८ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ८५२ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळले.
जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत रविवारचा अपवाद वगळता वाढ कायम आहे. दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज १, पलूस ५, जत, कडेगाव, खानापूर प्रत्येकी २, तासगाव, मिरज तालुका, शिराळा प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआर अंतर्गत २७६९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३३९ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲंटिजनच्या ९७२३ जणांच्या नमुने तपासणीतून ७४२ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत घट झाली असून सध्या ८ हजार ७६० जण उपचार घेत आहेत. त्यातील ९३१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ७८० जण ऑक्सिजनवर तर १५१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला तर ८ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १४३८२४
उपचार घेत असलेले ८७६०
कोरोनामु्क्त झालेले १३१०२४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४०४०
पॉझिटिव्हीटी रेट ८.६५
सोमवारी दिवसभरात
सांगली १०४
मिरज ३७
आटपाडी ३९
कडेगाव ९०
खानापूर ४५
पलूस ९३
तासगाव ५६
जत २८
कवठेमहांकाळ ३६
मिरज तालुका ११७
शिराळा ९१
वाळवा ३३७