शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:19 IST

सांगली  : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी आणि  कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 ...

ठळक मुद्देझरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी, आंबेगाव व विहापूरचे कंटेनमेंट झोन रद्दजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आदेश

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी आणि  कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 जून रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 27 मे रोजीच्या कंटेनमेंट झोनची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  दि. 2 जुलै रोजी रद्द केल्या असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.

आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे व लेंगरेवाडी आणि  कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.

आटपाडी तालुक्यातील क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 4 जून रोजी निदर्शनास आले असून तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. या झोनचे 28 दिवस 2 जुलै रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेल्या अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 3 जुलै 2020 पासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.

आंबेगाव येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शेवटचा बाधित रूग्ण दि. 27 मे रोजी निदर्शनास आला असून तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. सदर झोनचे 28 दिवस 25 जून रोजी पूर्ण झाले आहेत. तर विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शेवटचा बाधित रूग्ण दि. 1 जून रोजी निदर्शनास आला असून तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही.

प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 जून रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सदर दोन्ही क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 27 मे रोजीच्या अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारीडॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 2 जुलै रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली