शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मिनी ऑलिम्पिकला कनोइंग, कयाकिंगचे खेळाडू मुकणार, संघटनेतील वादाचा फटका 

By अविनाश कोळी | Updated: January 3, 2023 15:44 IST

मर्जीनुसार झालेली निवड यामुळे खेळाडूंची मोठी हानी

अविनाश कोळीसांगली : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्यावतीने जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेपासून राज्यातील  कनोइंग व कयाकिंगचे हजारो खेळाडू वंचित राहण्याची शक्यता आहे. संघटनेच्या वादाचा फटका, परस्पर दुसऱ्या संघटनेला मान्यता व मर्जीनुसार झालेली निवड यामुळे खेळाडूंची मोठी हानी झाली आहे. राज्यातील खेळाडूंनी याबाबत क्रीडा विभागाकडे तक्रारी केल्या असून, न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोइंग अँड कयाकिंग या राज्य संघटनेच्या दोन कार्यकारिणी अस्तित्वात असल्याने राज्यस्तरीय प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी लाभ देणार नसल्याचा निर्णय क्रीडा व युवक सेवा विभागाने घेतला होता. या संघटनेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील सहा खेळ प्रकारांबाबत संघटनेचे वाद न्यायालयात सुरू असल्याने मिनी ऑलिम्पिकसाठी खेळाडू निवडीचा गोंधळ झाला आहे. या स्पर्धेपासून अनेक गुणवान खेळाडू वंचित राहण्याची शक्यता आहे.क्रीडा विभागाच्या २७ मे २०२२ रोजीच्या पत्रान्वये मिनी ऑलिम्पिकमध्ये कनोइंग व कयाकिंग खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ४८० दाखविली आहे. याशिवाय ४० पंच, ३ अधिकारी, १६ मार्गदर्शक व २० स्वयंसेवकांचाही यादीत समावेश आहे. ऑलिम्पिकला पुरुष ९० व महिला ९० असे जास्तीत जास्त १८० खेळाडू सहभागी होऊ शकतात. तरीही इतकी मोठी यादी कशी, असा सवाल क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने अनधिकृतरीत्या संलग्नता दिलेल्या कार्यकारी मंडळाने भंडारा येथे अनधिकृत निवड चाचणी स्पर्धा घेतल्याची तक्रार केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील खेळाडूंना याची कल्पनाच नाही. त्यामुळे परभणी, बीड, नाशिक, कोल्हापूर, आदी जिल्ह्यांतून खेळाडूंनी राज्याच्या क्रीडा आयुक्तांना निवेदने दिली आहेत.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी निवड चाचणी घेऊन रीतसर खेळाडूंची निवड करण्याची मागणीही केली आहे.

राज्यातील खेळाडूंनी केली तक्रारकोल्हापूर, परभणी, नाशिक, बीड, नांदेड येथील खेळाडूंनीही राज्याच्या क्रीडा आयुक्तांना निवेदने दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा संघ निवड चाचणीची आम्ही वाट पाहत होतो. त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. अशातच जिल्हा संघ निवड चाचणी न घेताच संघ भंडारा येथे गेल्याचे नुकतेच समजले. आम्ही जुन्या संघटनेचे खेळाडू आहोत. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे याची चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी  निवेदनात केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली