शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताला निमंत्रण देणारी ऊस वाहतूक?????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम आता बहरात आला असला तरी, ऊस वाहतूक धोक्याच्या वाटेवरुन चालली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम आता बहरात आला असला तरी, ऊस वाहतूक धोक्याच्या वाटेवरुन चालली आहे. बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर अशाा वाहनांमधून रात्री होणारी ऊस वाहतूक व रिफ्लेक्टर नसताना केला जाणारा प्रवास अपघाताला निमंत्रण देत आहे.

सांगली जिल्ह्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा १ लाख ९ हजार १५५ हेक्टर उसाचे उत्पादन आहे. साखर कारखान्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रत्येक कारखाना मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू आहे. बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांचा यासाठी वापर केला जातो. ९८ टक्के बैलगाडीला रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून आले. बहुतांश ट्रॅक्टरचे रिफ्लेक्टर जुने व नावापुरते लावल्याचे दिसून येते. ट्रकचीही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना ही ऊस वाहतूक करणारी वाहने दिसत नाहीत. त्यांचा अंदाज न आल्याने दरवर्षी अपघात होतात. या अपघातात अनेकांचे जीवही जातात. त्यामुळे अशाप्रकारच्या वाहतुकीला नियमांच्या काटेकोर पालनाचे बंधन घातले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून या ऊस वाहतुकीकडे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे दरवर्षी अपघात वाढत आहेत.

चौकट

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर घ्यावी सर्वाधिक काळजी

सांगली-इस्लामपूर या मार्गावर सर्वाधिक ऊस वाहतूक केली जाते. या मार्गावरुन वसंतदादा, सर्वोदय, हुतात्मा व राजारामबापू साखर कारखान्याला ऊस जात असतो. त्यामुळे सांगलीपासून इस्लामपूर शहरापर्यंत सर्वत्र उसाची वाहने दिसतात. हा रस्ता खराब असून, त्यात ऊस वाहतूक मोठी असल्याने तो अधिक धोकादायक बनला आहे.

चौकट

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एकूण संख्या १४

कोट

ऊस वाहतूक वाहनांच्या मालकांनी, कारखान्यांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत दक्षता घ्यायला हवी. या वाहनांमुळे होणारे अपघात हे रिफ्लेक्टरअभावी होतात. त्यामुळे आम्ही वाहतूक विभागालाही अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांना रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीस अधीक्षक

चौकट

ऊस वाहतुकीमुळे वाढताहेत अपघात

जिल्ह्यात २०१९ मध्ये एकूण ७५६ अपघात झाले असून, त्यात २९३ जणांचा मृत्यू झाला. ६६५ लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. यात ट्रक, ट्रॅक्टरचे अपघात हे ३ टक्के आहेत. यात ऊस वाहतुकीमुळे झालेल्या अपघातांचाही समावेश आहे. जिल्ह्यात अरुंद रस्त्यांची संख्याही अधिक आहे. अशा मार्गांवरुन ऊस वाहतूक होत असतानाही अपघात होत आहेत. रात्री जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी रात्री ऊस वाहतूक करणारी वाहने थांबलेली असतात. हे प्रकारही अपघाताला निमंत्रण देत आहेत.ऊस वाहतुकीमुळे वाढताहेत अपघात