शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांकडून आरक्षणे रद्दच्या उपसूचना रद्द : स्वतंत्र प्रस्ताव आणण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:41 IST

सांगली : गत महासभेत उपसूचनाव्दारे मोक्याच्या जागांवरची आरक्षणे उठवण्याच्या ३४ उपसूचना महापौर हारुण शिकलगार यांनी अखेर रद्द केल्या.

ठळक मुद्देसर्वपक्षीयांच्या आंदोलनावर कुरघोडी

सांगली : गत महासभेत उपसूचनाव्दारे मोक्याच्या जागांवरची आरक्षणे उठवण्याच्या ३४ उपसूचना महापौर हारुण शिकलगार यांनी अखेर रद्द केल्या. या सूचनाबाबत नगररचना विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून स्वतंत्र प्रस्ताव सभेसमोर आणण्याचे आदेशही दिले. दरम्यान, आरक्षण उठविण्यावरून सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी आंदोलनाची हाक दिली आहे. तत्पूर्वीच सर्व उपसूचना रद्द करून महापौरांनी आंदोलनकर्त्यांवर कुरघोडी केली.

गत महापालिकेच्या सभेत प्रभागातील आरक्षित जागेवर घरे दाखवून ही सर्व आरक्षणे रद्द करण्याच्या उपसूचना दाखल केल्या होत्या. मागच्या एका प्रस्तावाचा आधार घेऊन या सर्व उपसूचना दाखल करुन जागांचा बाजार करण्याचा उद्देश होता. तब्बल ३४ आरक्षित जागांवरची आरक्षणे उठवण्याची उपसूचना दाखल केली होती. यात नगरसेवक प्रशांत मजलेकर यांची पांजरपोळ येथील जागेवरचे ट्रकपार्किंगचे आरक्षण उठवणे, प्रशांत पाटील यांची कुपवाड येथील रस्त्याची रुंदी कमी करण्यासाठी फेरफार करुन आरक्षण रद्द करणे, संगीता हारगे यांची मिरजेतील बुधवार पेठेतील जागेवर रस्त्याचे असलेले आरक्षण रद्द करणे, संगीता खोत यांची प्रायमरी स्कूल, ग्राऊंड, ट्रक पार्किंगचे आरक्षण रद्द करणे, मैनुदीन बागवान यांची प्रायमरी स्कूलचे आरक्षण उठवणे, बाळासाहेब गोंधळी यांची शंभर फुटी रस्त्याचे आरक्षण रद्द करणे, पांडुरंग भिसे यांची सांगलीवाडीतील प्रायमरी स्कूल, प्ले ग्राऊंडचे आरक्षण रद्द करणे, शुभांगी देवमाने यांचा मिरजेतील घरांसाठी रस्त्याचे आरक्षण करणे, प्रार्थना मद्भावीकर यांचा मिरजेतील रस्त्याचे आरक्षण रद्द करणे, वंदना कदम यांचा सांगलीवाडीतील गार्डनचे आरक्षण रद्दचा प्रस्ताव, कांचन कांबळे यांचा डीपी रोड, प्ले ग्राऊंड, प्रायमरी स्कूल, ट्रकपार्किंगचेआरक्षण रद्द करणे, राजू गवळी यांचा ४० ते ५० घरे बाधीत होत असल्याने त्रिमूर्ती कॉलनीमधील डीपी रोडचे आरक्षण रद्द करणे, युवराज गायकवाड यांचा कुपवाडमधील डीपीरोडचे आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव, बसवेश्वर सातपुते यांचा मिरज कुंभारखण परिसरातील घरी बाधित होणार असल्याने रस्त्याचे आरक्षण रद्द करणे, जुबेर चौधरी यांचा मिरजेतील अल्फोन्सा स्कूलजवळील रोडचे आरक्षण रद्द करण्याच्या उपसूचना दिल्या होत्या. त्या महापौर शिकलगार यांनी फेटाळून लावल्या.अहवाल सादर करामहापौर शिकलगार यांनी प्रशासनाला आरक्षित जागेवरील किती घरे आहेत? किती घरे बाधित होती? याचा सविस्तर अहवाल सादर करा, प्रत्येक सूचनेचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असेही आदेश दिले आहेत.