शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मिनाई आश्रमशाळेची मान्यता अखेर रद्द : कुरळपचे लैंगिक शोषण प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:29 IST

कुरळप (ता. वाळवा) येथे मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणानंतर सर्व चौकशीअंती मोरणा शिक्षण संस्था संचालित मिनाई आश्रमशाळेच्या प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीनही विभागांचे परवाने रद्द

ठळक मुद्देचौकशी अहवालानंतर कारवाई

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथे मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणानंतर सर्व चौकशीअंती मोरणा शिक्षण संस्था संचालित मिनाई आश्रमशाळेच्या प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीनही विभागांचे परवाने रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले.

संपूर्ण राज्यात खळबळ माजवणाऱ्या कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतील ८ मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांची जवळच्या जि. प. शाळेत व इतर मान्यताप्राप्त शाळेत सोय करण्यात यावी, असे सक्त आदेश संबंधित समाजकल्याणचे आयुक्त यांना देण्यात आले आहेत. ‘लोकमत’ने वारंवार या शाळेच्या व संस्थेच्या भ्रष्ट कारभारावर प्रकाशझोत टाकला आहे.

दि. २६ सप्टेंबर २०१८ ला राज्याच्या शिक्षण क्षेत्रात काळीमा फासणारी दुर्दैवी घटना, सहायक पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना पाठविलेल्या गोपनीय पत्राद्वारे उघडकीस आली होती. संस्थेचा संस्थापक अरविंद आबा पवार याने शाळेतील मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे हिला मदतीला घेऊन शाळेत शिकणाºया अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पवार व मनीषा कांबळे यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर संस्थेच्या भ्रष्टाचाराचे एकामागून एक नमुने उघडकीस आले.

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात शासनाने उपसंचालक जयश्री सोनकवडे, मेघराज भाते यांची नेमणूक करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दोघांनीही संस्थेच्या सद्यस्थितीचा अहवाल शासनास सादर केला होता. यातील अंतिम अहवालातील संदर्भ क्रमांक ४ नुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण अधिनियम १९४९ मधील परिच्छेद क्रमांक ३५ मधील तरतुदीनुसार मिनाई आश्रमशाळेची मान्यता रद्द केली. मुंबई येथे मानव अधिकारी यांच्यासमोर दि. २७ रोजी सुनावणी होणार असल्याचे समजते.

कर्मचाऱ्यांचे हालमिनाई आश्रमशाळेची मान्यताच रद्द केल्याने या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारण त्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन होऊ शकत नाही. मात्र संस्थापकास पाठबळ देणारे अधिकारी चौकशीविना मोकाट आहेत.

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षानंतर हा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल. अत्याचारित मुलींना योग्य तो न्याय मिळावा व मुलींना निर्भय वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू.- डॉ. आ. नीलम गोºहे, शिवसेना प्रवक्त्याशासनाने कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेची मान्यता रद्द करून अत्याचारित मुलींना न्याय दिला आहे. भविष्यात अशा घटना होऊच नयेत यासाठी संस्थापक व शाळेतील शिक्षकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. - जयश्री सोनकवडे, उपसंचालक, विमुक्त जाती भटक्या जमाती विभाग पुणे

टॅग्स :Sangliसांगली