शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत केंद्र, लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 11:23 IST

सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपत्ती पिडीतांसाठी विधी सेवांचे प्रदान करण्याच्या योजनेंतर्गत पूरग्रस्त नागरिकांसाठी विविध ...

ठळक मुद्देपूरग्रस्तांसाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत केंद्रलाभ घेण्याचे आवाहन

सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपत्ती पिडीतांसाठी विधी सेवांचे प्रदान करण्याच्या योजनेंतर्गत पूरग्रस्त नागरिकांसाठी विविध ठिकाणी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय, सांगली, वाळवा तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय इस्लामपूर, मिरज तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय मिरज व पलूस तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय पलूस येथे यांचा समावेश आहे.

गरजू पूरग्रस्त नागरिकांनी संबंधित मदत केंद्रास संपर्क साधण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विजय व्यं. पाटील व सचिव विश्वास शि. माने यांनी केले आहे.या मदत केंद्रामध्ये पुढील परिस्थितीमध्ये सहाय्य मागता येईल. मदतकार्य साहित्यांच्या वितरणाबाबत, कुटुंबातील सदस्यांची पुर्नभेट करण्याच्या कामाबद्दल, पिडीतांच्या आरोग्याची देखभाल करणे आणि साथीच्या रोगांच्या फैलावास प्रतिबंध घालण्याबाबत, महिला आणि बालकांच्या गरजांबाबत, अन्न, पिण्याचे पाणी व औषधे यांच्या उपलब्धतेबाबत, हानी पोहोचलेल्या राहत्या घरांच्या पुनर्रचनेबाबत, पशुधन आणि जंगम मालमत्ता यांच्या पुन:स्थापनेबाबत, आपत्ती पिडीतांचे कायदेशीर हक्काबाबत, किंमती (मौल्यवान) दस्तऐवज पुन्हा बनविण्याकरिता सहाय्य मिळणेबाबत, अनाथ बालकांचे पुनर्वसन आणि भविष्यातील देखभाल व शिक्षणाबाबत, पिडीतांसाठी ऋण निवारण उपाययोजनाबाबत, आपल्या कुटुंबांचा आधार गमावलेल्या वृध्द आणि अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनेबाबत, विमा योजनांशी संबंधित समस्याबाबत, गमावलेला व्यवसाय व उद्योग धंदा परत सुरू करण्यासाठी बँक कर्जाचे व्यवस्थेबाबत, आपत्तीमुळे मानसिक धक्का लागलेल्या व नैराश्य आलेल्या पिडीतांचे समुपदेशन करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ / मानसोपचार तज्ज्ञ यांच्या सेवांच्या व्यवस्थेबाबत सहाय्य मागता येईल. 

 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरCourtन्यायालय