शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण 

By अशोक डोंबाळे | Updated: February 16, 2024 17:03 IST

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली

सांगली : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यासोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले.आमदार अनिल बाबर यांचे ३१ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार होते. या रिक्त जागेवर निवडणूक होणार की नाही, याबाबत उलट-सुलट चर्चा रंगली होती. अशातच केंद्रिय निवडणूक आयोगाकडून खानापूर पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना, मतदार संख्या, केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान यंत्र याबाबतची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने माहिती निवडणूक विभागाला सादर केली.पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही सोलापूर येथून मागविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभेबरोबर पोटनिवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

सुहास बाबर यांच्या नावाची चर्चाअनिल बाबर त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले असून बाबर कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता आहे. सुहास बाबर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे, बाबर यांच्या राजकीय वाटचालीत सुहास बाबर अग्रेसर होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुहास बाबर यांना संधी मिळण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक