शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मलकापुरात महामार्गावर द बर्निंग ट्रक !

By admin | Updated: March 8, 2017 23:28 IST

पुणे-बेंगलोर महामार्गावर थरार : चालत्या ट्रकला भीषण आग; लाखोचे नुकसान, दीड तास लेन बंद

मलकापूर : कोल्हापूरहून बारामतीकडे निघालेल्या चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने मलकापुरात महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार झाला. येथील कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत ट्रकच्या केबिनसह समोरील भाग जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे चौघांचे जीव वाचल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, दोन अग्निशामक बंबांच्या साह्याने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शांतीलाल रामचंद्र गावडे (वय ३९, रा. पाटस, ता. दौंड ) हे मालट्रक (एमएच ४२ टी ६९९४) मध्ये पाटस येथील तीन व्यापाऱ्यांचा कांद्याचा माल घेऊन कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूर येथे कांद्याची विक्री करून तीन व्यापाऱ्यांसह ते बुधवारी पुन्हा पाटस, ता. दौंड येथे जाण्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून निघाले होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मलकापूर, ता. कऱ्हाड येथील उड्डाणपुलावर आले असता ट्रकच्या केबिनमध्ये धूर येत असल्याचे चालक गावडे यांच्या निदर्शनास आले. ट्रक उड्डाणपुलावरून खाली घेऊन काय झाले ते पाहण्यासाठी ट्रक तसाच पुढे नेला. काही अंतर पार केल्यावर ट्रकच्या केबिनमध्ये शार्टसर्किटने पेट घेतला. ट्रक महामार्गाकडेला घेईपर्यंत केबिनमध्ये जाळाच्या ज्वाळा निर्माण झाल्या. चालकाने प्रसंगावधान राखत हळूहळू पेटता ट्रक पाचशे मीटरवर नेऊन थांबवला. ट्रकमधील व्यापाऱ्यांसह स्वत: सुरक्षित खाली उतरले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. ट्रक पेटल्याची माहिती झपाट्याने परिसरातील नागरिकांना समजली. जवळच असलेल्या महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. आगीची माहिती तत्काळ कृष्णा रुग्णालयातील व कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. दोन अग्निशामक बंबांच्या साह्याने दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. कोल्हापूर-सातारा लेनवर हा द बर्निंग ट्रकचा थरार सुरू असल्यामुळे कऱ्हाड शहर पोलिस, महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दीड तास या लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. दीड तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. (प्रतिनिधी)फोटोशेषणच जास्त... चालत्या ट्रकला आग लागल्याचे समजताच महामार्गासह उपमार्गावर बघ्यांची तोबा गर्दी निर्माण झाली होती. प्रत्येकाने आपली वाहने अस्ताव्यस्त लावल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अशा घटनेवेळी मदत करण्यापेक्षा आपापल्या मोबाईलने फोटो काढण्यात धन्यता मानत होते.ट्रकला आग लागलेल्या ठिकाणी उपमार्गाकडेला हिंदुस्थान मार्बल नावाचे दुकान आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक येण्यापूर्वी दोरीने कळशी बांधून पुलावर आग विझविण्यासाठी पाणी पुरवले. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे यापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.