शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन

By शीतल पाटील | Updated: October 25, 2023 16:20 IST

सांगली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर आर. एन. फौडेंशनच्यावतीने आयोजित दसरा महोत्सवात ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात ...

सांगली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर आर. एन. फौडेंशनच्यावतीने आयोजित दसरा महोत्सवात ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी नेत्रदीपक आतषबाजीने मैदान उजळून निघाले होते. यावेळी शहरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.राजेश नाईक फौंडेशनच्यावतीने दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, माजी नगरसेवक राजेश नाईक उपस्थित होते. यानंतर गणरायाच्या पहिले नमन या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सॅड्रिक डिसूझा यांच्या टीमचा बहारदार नृत्याविष्कार सादर केला. अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव जोडीच्या हास्याच्या चौफेर फटकेबाजीने सांगलीकरांना खळखळून हसवले. यानंतर ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे तिरंदाजीने दहन करण्यात आले. यावेळी नेत्रदीपक आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता.यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, माजी नगरसेवक मनोज सरगर, शेखर माने, पद्माकर जगदाळे, उपायुक्त राहुल रोकडे, काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राजेश नाईक फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप आपटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले. सूत्रसंचलन जयंत भालेराव आणि मोनिका जाजू यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगली