शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

रस्त्याच्या वादातून ऊस जाळला

By admin | Updated: January 19, 2015 00:23 IST

लिंगनूर येथील घटना : सातजणांवर अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल

मिरज : तालुक्यातील लिंगनूर येथे रस्त्याच्या वादातून दलित शेतकऱ्यांचे ऊस पीक जाळून दोन लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी सात जणांविरुध्द दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोमलिंग द्रौपदी कांबळे (रा. खटाव) या शेतकऱ्याने पोलिसात फिर्याद दिली आहे.खटाव येथील सोमलिंग कांबळे यांनी पाच वर्षांपूर्वी लिंगनूर येथे शेतजमीन घेतली आहे. यापैकी अडीच एकर क्षेत्रात लावलेला ऊस तोडून नेण्यासाठी शेजाऱ्यांनी रस्ता अडविला होता. रस्त्याच्या वादाबाबत तहसीलदारांकडे खटला प्रलंबित असल्याने सोमलिंग कांबळे यांनी पोलीस उपअधीक्षक व प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन, उसाचे पीक काढून कारखान्याला पाठविण्यासाठी तात्पुरता रस्ता मिळवून देण्याबाबत विनंती केली. त्यानुसार पोलीस व मंडल अधिकाऱ्यांनी सोमलिंग कांबळे यांच्या शेजाऱ्यांना ऊस जाण्यासाठी तात्पुरता रस्ता देण्याबाबत सूचना दिली. मात्र त्यानंतर शनिवारी रात्री अज्ञातांनी कांबळे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला. आगीत ऊस व ठिबक संच जळाल्याने पावणेदोन लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत सोमलिंग कांबळे यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.माणिक आप्पू नाईक, प्रतीक माणिक नाईक, आनंदा नाईक, अमोल नाईक, सागर टोणे (सर्व रा. लिंगनूर) यांनी, आपल्या शेजारी दलित असू नये, मी शेती सोडून जावे, यासाठी उसाचे पीक पेटवून देऊन नुकसान केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)तात्पुरती वाटही मिळाली नाही.सोमलिंग कांबळे यांनी पाच वर्षांपूर्वी लिंगनूर येथे जमीन घेतली आहे. मात्र या जमिनीकडे जाण्यासाठीच्या रस्त्याबाबत वाद आहे. अडीच एकरात कांबळे यांनी ऊस लावला आहे. रस्त्याच्या वादाबाबत तहसीलदारांकडे खटला प्रलंबित असल्याने सोमलिंग कांबळे यांनी पोलीस उपअधीक्षक व प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन, ऊस तोडीसाठी तात्पुरता रस्ता मिळवून देण्याची विनंती केली. त्यानुसार पोलीस व मंडल अधिकाऱ्यांनी सोमलिंग कांबळे यांच्या शेजाऱ्यांना ऊस जाण्यासाठी तात्पुरता रस्ता देण्याबाबत सूचना दिली. मात्र त्यानंतर शनिवारी रात्री अज्ञातांनी कांबळे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला.