शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

'जयंत केसरी' बैलगाडी स्पर्धेत 'शंभू आणि चिमण्या" बैलजोडीनं पटकावला पहिला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2025 22:35 IST

महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती ही या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. मुख्य संयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहीगडे यांनी हे तिसरे पर्व यशस्वी केले.

प्रताप बडेकर 

कासेगाव - कासेगाव ता.वाळवा येथील  मैदानात झालेल्या 'जयंत केसरी' बैलगाडी स्पर्धेत 'शंभू आणि चिमण्या"ही बैलजोडी ठरली  प्रथम क्रमांकाची मानाची हिंदकेसरी जोडी. तब्बल ५ लाख १६,२६५ रुपये व मानचिन्ह पटकावले. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी जि. प अध्यक्ष देवराज पाटील,खंडेराव जाधव,संयोजक अतुल लाहीगडे आदी उपस्थित होते.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेस  भव्य अशा मैदानात या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.राज्यभरातून जवळपास ४०० पेक्षा जास्त बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.सर्व सहभागी स्पर्धक बैलगाडी मालकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित,डोळ्याचे पारणे फिटेल अशा पध्दतीने अंतिम फेरी झाली. अतिशय चुरशीच्या फेरीत शंभू-चिमण्या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला.  स्वर्गीय शरद आण्णा लाहीगडे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी नेटके संयोजन केले होते. महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती ही या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. मुख्य संयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहीगडे यांनी हे तिसरे पर्व यशस्वी केले.

मैदानास हिंदकेसरी 'किताब

कासेगाव येथें जयंत केसरी स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते.दर्जा,पारदर्शक पणा, सोयी-सुविधा व व्यवस्थापन पाहून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने या मैदानास हिंदकेसरी 'किताब देण्यात आला. सांगली जिल्ह्याला हा पहिलाच मान मिळाला. त्यामुळे सर्वांनी संयोजक अतुल लाहीगडे यांचे कौतुक केले.कासेगाव ग्रामस्थांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील