आष्टा : ‘जयंत अॅग्रो २०१५’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशू-पक्षी प्रदर्शनात आयोजित पशू-पक्षी स्पर्धेत दत्तात्रय शिणगारे (येलूर) यांची पंढरपुरी म्हैस, प्रकाश बसुगडे (आष्टा) यांची देशी गाय, तर नायकू भोसले (बावची) यांच्या खिलार चार दाती बैलाने प्रथम क्रमांक पटकाविला. जयंत अॅग्रोचे अध्यक्ष रामरावतात्या देशमुख, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धेचा निकाल असा- पंढरपुरी म्हैस- दत्तात्रय शिणगारे, येलूर, नामदेव खरात, खरातवाडी, संजय शिणगारे, येलूर. रेडी गाभण- अक्षय खोत, बागणी, अशोक नलवडे, शिराळा, दादासाहेब पाटील, नागाव. रेडी- श्रीकांत पाटील, देवर्डे, शंकर दुर्गावळे, लवणमाची, जगन्नाथ जाधव, येलूर.घोडा- पोपट चव्हाण, कुंभारगाव, अविनाश मंडले, पोखर्णी. शेळी मेंढी- गोविंद सिसाळ, पलूस, शीतल मगदूम, इचलकरंजी, संदीप सिसाळ, पलूस. नर शेळी- आनंदा सिसाळ, पलूस, श्रृती बाळीकाई, हुपरी, सुनील परीट, आष्टा. मेंढा-भरत मोरे, चिखली, शीतल मगदूम, इचलकंरजी, मयूर वरूटे, चिखली.मुक्त गोठा प्रकल्प- संजय कुंभार, नरसिंहपूर, कोंबडी गट- रिजवाज नायकवडी, आष्टा. पशू-पक्षी सहभाग गट- शीतल मगदूम, इचलकंरजी, जालिंदर रकटे, बावची. एच. एफ़ गाय- विकास भोसले, बावची, भरत बच्चे, बच्चेसावर्डे, संजय कुंभार, नरसिंहपूर. जर्सी गाय- जालिंदर बाबर, साखराळे, सुवर्णा शिणगारे, येलूर, शामराव बच्चे, बच्चेसावर्डे. पाडी गाभण- संजय कुंभार, नरसिंहपूर, नितीन आरबुने, दुधोंडी, संजय कुंभार, नरसिंहपूर. पाडी गाय-अभिजित मोटे, येलूर, आकाश शिणगारे, येलूर, अमोल महाडिक, येलूर. देशी गाय- प्रकाश बसुगडे, आष्टा, वैभव खोत, बहाद्दूरवाडी, आप्पासाहेब पाटील, दत्तवाड. खिलार आदत बैल दोन दाती- किरण माळी, वाळवा, आनंदराव ढोले, आष्टा, शिवाजी पाटील, नागाव. खिलार बैल ४ दाती, ६ दाती- नायकू भोसले, बावची, रणजित कोकाटे, पडवळवाडी, वसंत पवार, धनगाव. बैलजोडी-राहुल यादव, बावची, मोहन पाटील, येडेनिपाणी, विजय गावडे, कोरेगाव. मुरा म्हैस- तिमगोंडा पाटील, हेर्ले, मोहन पाटील, भरतवाडी, रामचंद्र शेवाळे, साखराळे.याप्रसंगी आनंदराव पाटील, संग्राम फडतरे, श्रेणिक कबाडे, नंदकुमार पाटील, एम़ बी़ पाटील, प्रतापराव पाटील, डी़ आऱ पाटील, व्यवस्थापकीय अधिकारी व्ही़ बी़ पाटील, प्रेमनाथ कमलाकर, प्रशांत पाटील उपस्थित होते़ डॉ़ एस़ डी़ ढोपे, डॉ. जे. जे. सुदम, डॉ़ वाय़ बी़ बामणे, डॉ़ पी़ एम़ शिंदे, डॉ़ व्ही़ एस़ नष्टे, डॉ़ आऱ एच़ कणसे, डॉ़ एम़ बी़ पाटील यांनी संयोजन केले. (वार्ताहर)प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसादमाजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चौथ्या ‘जयंत अॅग्रो २०१५’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशू-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात अडीच एकरात सुपर स्ट्रक्चर मंडप घातला आहे़ यामध्ये ८0 बाय १00 ची ३ सुपर स्ट्रक्चर उभी केली आहेत़ यामध्ये राजारामबापूंनी स्थापन केलेल्या संस्था, पाणी पुरवठा संस्था आदींच्या माध्यमातून झालेली वाळवा तालुक्याची प्रगती अधोरेखित केली होती.
शिणगारे यांची म्हैस, भोसले यांचा बैल प्रथम
By admin | Updated: February 19, 2015 23:37 IST