शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट, स्टील कंपन्यांच्या नफेखोरीविरोधात बांधकाम व्यावसायिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 16:45 IST

Sangli news- सिमेंट आणि स्टील कंपन्यांच्या नफेखोरीविरोधात बांधकाम व्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. शुक्रवारी देशव्यापी काम बंद आंदोलन केले. दोन महिन्यांत ४० टक्के दरवाढीमुळे कंबरडे मोडल्याची तक्रार बांधकाम व्यावसायिकांनी केली.

ठळक मुद्देसिमेंट, स्टील कंपन्यांच्या नफेखोरीविरोधात बांधकाम व्यावसायिक एकवटले देशव्यापी काम बंद आंदोलन; स्टील, सिमेंट नियामक प्राधिकरणाची मागणी

सांगली : सिमेंट आणि स्टील कंपन्यांच्या नफेखोरीविरोधात बांधकाम व्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. शुक्रवारी देशव्यापी काम बंद आंदोलन केले. दोन महिन्यांत ४० टक्के दरवाढीमुळे कंबरडे मोडल्याची तक्रार बांधकाम व्यावसायिकांनी केली.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या बंदला क्रेडाई, हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, इंजिनीअर्स ॲण्ड आर्किटेक्टस असोसिएशन, सिव्हील इंजिनीअर्स असोसिएशन आदींनी पाठींबा दिला, त्यामुळे जिल्ह्यात शेकडो बांधकामे ठप्प झाली. बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कौलगुड, सचिव अमित पेंडुरकर, क्रेडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे, रोड बिल्डर्स असोसिएशनचे बाबा गुंजाटे यांनी भूमिका विशद केली.

ते म्हणाले, कोरोना ओसरताच स्टील व सिमेंटची दरवाढ सुरु झाली. दोन महिन्यांत सिमेंट गोणीमागे १०० ते १४० रुपयांनी महागले. सळी टनामागे १५ ते २० हजारांनी भडकली. बांधकामात त्यांचा वापर ६५ टक्के आहे, त्यामुळे दरवाढीचा थेट फटका बसला. कौलगुड म्हणाले की, परवडणार्या घरांची घोषणा सरकार करो, पण स्टील व सिमेंटच्या दरवाढीने घरांच्या किंमती भडकणार आहेत. खिलारे म्हणाले, कंपन्यांनी एकजुट केली असून नफेखोरीतून मिळणारा पैसा राजकारणासाठी वापरला जात असावा.कृत्रिम दरवाढीविरोधात संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन दिले. यावेळी अनंत खैरमोडे, स्वप्नील कुंभारकर. एस. एफ. चौगुले, अनिल बाफना, एस. बी. पाटील, दिलीप पाटील, सुनील कोकीतकर आदी उपस्थित होेते.नियामक प्राधिकरणाची मागणीकौलगुड म्हणाले, सिमेंट व स्टीलचा कच्चा माल देशातच उत्पादीत होत असतानाही भरमसाट दरवाढ सुरु आहे. याच्या निषेधार्थ भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचीही तयारी आहे. सिमेंटवर सर्वाधिक म्हणजे २८ टक्के जीएसटी आकारला जातो. दर वाढतील त्यानुसार जीएसटी संकलनही वाढते, त्यामुळे सरकार कानाडोळा करत असावे. दरवाढीवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय सिमेंट व स्टील नियामक प्राधिकरण स्थापन करावे अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :Sangliसांगली