तासगाव : यंदाच्या सुमारे ३२ कोटी ५९ लाख ४६ हजार ४0९ रुपयांच्या अर्थसंकल्पाला आज (शुक्रवारी) तासगाव नगरपरिषदेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ९ लाख ३६ हजार ४0९ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आज झालेल्या सभेत सभागृहापुढे सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय पवार होते. मुख्याधिकारी अभिजित वायकोसही यावेळी उपस्थित होते. आगामी अर्थसंकल्पाच्या जमेच्या रकान्यात करापासूनचे उत्पन्न १ कोटी ५९ लाख २५ हजार, विशेष अधिनियमातील वसुली ११ हजार, पालिकेच्या सेवा व मालमत्तेपासूनचे उत्पन्न ३६ लाख ७३ हजार, इतर उत्पन्न ८२ लाख ९३ हजार असे पालिकेचे स्वत:चे उत्पन्न दोन कोटी ७९ लाख २ हजार रुपये दाखविण्यात आले आहे. शासकीय अनुदानाखाली महसुली अनुदान ९ कोटी ३१ लाख ५0 हजार रुपये, कर्जाकडून विकास कामे व पाणी पुरवठा २ कोटी ६५ लाख, असाधारण उत्पन्न ३ कोटी ४८ लाख १५ हजार असे २0१५-१६ मधील अपेक्षित उत्पन्न २५ कोटी ७८ लाख ९३ हजार दाखविण्यात आले आहे. आरंभीची अपेक्षित शिल्लक ६ कोटी ८0 लाख ५३ हजार ४0९ रुपये, एकूण उत्पन्न ३२ कोटी ५९ लाख ४६ हजार ४0९ रुपये दाखविण्यात आले आहे.खर्चाच्या रकान्यात कर्मचारी वेतन, भत्ते- २ कोटी २६ लाख ८१ हजार, निवृत्ती वेतन १ कोटी ५0 लाख, निवृत्ती वेतन वर्गणी २४ लाख, कर्जाची परतफेड ३५ लाख, कर्जहमी शुल्क २ लाख २0 हजार, मागासवर्गीयांसाठी राखीव ५ टक्के रक्कम ५ लाख ४0 हजार, महिला व बालकल्याण योजनेसाठीची रक्कम ५ लाख ४0 हजार, वर्गणी, घसारा, आपत्ती निवारण २0 लाख ९५ हजार, हिवताप, साथीचे रोग निर्मूलन स्वच्छता ठेका ५५ लाख ४६ हजार, स्टेशनरी ३ लाख ८0 हजार, कोटेशन नोटीस १ लाख २५ हजार, दूरध्वनी शुल्क १ लाख १0 हजार, पथदिवे वीज बिल २२ लाख ८५ हजार, पथदिवे खरेदी, दुरुस्ती ३ लाख २५ हजार, पाणीपुरवठा देखभाल २१ लाख २५ हजार, पाणीपुरवठा वीज बिल १ कोटी २0 लाख, पाणीपुरवठा बिगर सिंचन आकार ७ लाख रुपये दाखविण्यात आला आहे. ट्रॅक्टर, ट्रॉली दुरुस्ती- २८ लाख ५0 हजार, गारबेज कॉम्पॅक्टर, मैला टँकर दुरुस्ती ३ लाख ५0 हजार, जीप देखभाल दुरुस्ती ३ लाख ५0 हजार, कर्मचाऱ्यांना गणवेश २ लाख २५ हजार, शिक्षण मंडळास वर्गणी ८ लाख, प्राथमिक शाळा इमारत दुरुस्तीसाठी १0 लाख, देणग्या ३ हजार असा खर्च दाखविला आहे.इतर सर्व बाबींवरील खर्च ५ कोटी ६३ लाख १0 हजार, असाधारण खर्चात अॅडव्हान्स, डिपॉझिट, शिक्षण कर ३ कोटी ४२ लाख ६५ हजार, असा वर्षाअखेर अपेक्षित शिलकीसह एकूण खर्च ३२ कोटी ५९ लाख ४६ हजार ४0९ रुपये दाखविला आहे. (वार्ताहर)शिवरायांच्या पुतळ्यासाठी २० लाखांची तरतूद तासगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी २0 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवपुतळ्याच्या नूतनीकरणाची मागणी होत होती. याबाबत शिवप्रेमींच्या भावनाही तीव्र होत्या. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या शिवपुतळ्याच्या सुशोभिकरणानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पालिकेला १५० वर्षेतासगाव नगरपरिषदेला यंदाच्या वर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने विविध उपक्रमांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. तसेच पालिका इमारतीच्या नूतनीकरणासाठीही निधी राखून ठेवण्यात आला आहे.शहर सुधारणेवर भरशहरात मुबलक व सुरळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी २४-७ या युआयडीएसएसएमटी या योजनेसाठी २ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शहर स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेका व अन्य कामांसाठी ५० लाख, तर शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी ४० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. पालिका इमारत जुनी झाल्याने तिच्या नूतनीकरणासाठी ३० लाख, तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विकास कामांसाठी ३ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
‘तासगाव’चा अर्थसंकल्प ३२ कोटींवर
By admin | Updated: February 27, 2015 23:24 IST