इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे बहुजन समाज पक्षाच्या तालुका महिला अध्यक्षा संजना आठवले यांनी तर दहीवडी (ता. तासगाव) येथे बहुजन समाज पक्षाचे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मन्सूर आतार यांची पत्नी रूक्साना आतार यांनी घवघवीत यश संपादन केले. यापूर्वी या पक्षाचा या मतदारसंघात एकही ग्रामपंचायत सदस्य नव्हता. बसपाचे राज्य सचिव शंकर माने हे पक्षवाढीसाठी मोठी मेहनत करीत आहेत. त्यामुळे आता पक्ष विस्तारित होत असल्याचे चित्र आहे. नवनिर्वाचित सदस्यांचा बहुजन समाज पक्षाच्या तालुका कार्यालयात प्रदेश सचिव शंकर माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विजय वाघमारे, सिद्धनाथ माने, सरिता जगताप, भूषण चंदनशिवे, सुनील खोतसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : ३० घाटनांद्रे १
ओळी : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे बसपाच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा प्रदेश सचिव शंकर माने यांनी सत्कार केला.