शिराळा : आम्ही लोकप्रतिनिधी असताना वारंवार मागणी व पाठ पुरवठा केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय इमारतीसाठी सव्वादोन कोटी रुपये मंजूर झाले अशी माहिती माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, आम्ही वेळोवेळी लक्ष घालून शिराळा तालुक्यात असणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी खेचून आणण्यात यशस्वी झालो आहे. त्यानुसार बहुतांशी शासकीय कार्यालये सुसज्ज आणि नवीन इमारतीमध्ये आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे कामकाज अपुऱ्या जागेत होते. येथील कर्मचारी, अधिकारी यांना व्यवस्थितपणे सुसज्ज जागेमध्ये काम करता यावे. यादृष्टीने आम्ही मंत्रालयीन स्तरावर आणि त्याचबरोबर अधीक्षक अभियंता कार्यालय कोल्हापूर, मुख्य अभियंता कार्यालय, पुणे यांच्याकडे सातत्याने आग्रही होतो. त्यानुसार नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सव्वादोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.