शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील पूल, बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

सांगली : पावसाच्या जोरदार सरींनी सांगली जिल्ह्याला झोडपले असून, नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, ...

सांगली : पावसाच्या जोरदार सरींनी सांगली जिल्ह्याला झोडपले असून, नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, तर अन्य तालुक्यांमध्ये संततधार सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातून विसर्गही सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल आणि कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे.

कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग सुरू होऊन कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.