शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या वर्कआॅर्डरला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत गुरुवारी अधिकाºयांच्या एकतर्फी कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त केला.सभेत अमृत योजनेतील मिरज पाणीपुरवठा ठेकेदाराला परस्परच कामाची समज देण्यात आली, तर सांगलीवाडी पाण्याच्या टाकीच्या ठेकेदाराला आयुक्तांनी स्थायीच्या मान्यतेशिवायच मुदतवाढ दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे सदस्यांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले. अमृत योजनेची कायदेशीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत गुरुवारी अधिकाºयांच्या एकतर्फी कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त केला.सभेत अमृत योजनेतील मिरज पाणीपुरवठा ठेकेदाराला परस्परच कामाची समज देण्यात आली, तर सांगलीवाडी पाण्याच्या टाकीच्या ठेकेदाराला आयुक्तांनी स्थायीच्या मान्यतेशिवायच मुदतवाढ दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे सदस्यांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले. अमृत योजनेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय वर्कआॅर्डर देऊ नये, असा आदेश सभापती बसवेश्वर सातपुते यांनी दिला.सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेत प्रशांत पाटील, रोहिणी पाटील, मृणाल पाटील या सदस्यांनी, अमृत योजनेतील ठेकेदाराला प्रशासनाने कामाची समज दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. स्थायी समितीत निविदा मंजुरीचे इतिवृत्त प्रलंबित आहे. निविदेतील जादा रकमेचा बोजा महापालिकेला सहन करावा लागणार आहे. स्थायीने केलेल्या ठरावात शासनानेच जादा रकमेचा भार उचलण्याची मागणी केली आहे. असे असताना शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत ठेकेदाराला परस्परच समज दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर सभापती सातपुते म्हणाले की, मिरजेसाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. ती रखडू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. निविदा प्रक्रियेतील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याचा अहवाल स्थायीकडे सादर करावा. तोपर्यंत ठेकेदाराला वर्कआॅर्डर देऊ नये, असे आदेश दिले.सांगलीवाडीचे नगरसेवक दिलीप पाटील यांनी, अमृत योजनेप्रमाणेच पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणाºया ठेकेदारालाही आयुक्तांनी परस्परच मुदतवाढ दिल्याचा आरोप केला. या ठेकेदाराची मुदत ३१ जुलै २०१६ रोजी संपली आहे. त्यानंतर त्यांना आयुक्तांनी मुदत दिली. त्यांना हा अधिकार आहे का? असा सवाल करून, ठेकेदाराचे दीड कोटीचे बिल देऊ नये, अशी मागणी केली. त्यावर सभापतींनी मुदतवाढीनंतर केलेल्या कामाचे बिल न देण्याचे आदेश दिले.ड्रेनेज ठेकेदाराने आॅक्सिडेशन पॉँडचे काम एक जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची हमी दिल्याचे अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले. ठेकेदाराने अजूनही काम सुरू केलेले नाही. त्यात एकही वाहिनी सक्रिय नाही. मग आॅक्सिडेशन पॉँड कसा सुरू करणार?, असा सवाल उपस्थितीत करीत सात दिवसांत काम सुरू न केल्यास दंडात वाढ करण्याची मागणी शिवराज बोळाज यांनी केली. सुलभ शौचालयाच्या दुरुस्तीसाठी जनरल फंडातून निधीची तरतूद केली जात असल्याबद्दलही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.