शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तारण सोन्यात घट प्रकरणी शाखा व्यवस्थापक, शिपाई निलंबित; जिल्हा बँकेची कारवाई  

By अविनाश कोळी | Updated: May 3, 2023 19:50 IST

जिल्हा बँकेच्या शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यात घट आल्याप्रकरणी जिल्हा बँकेने येथील शाखा व्यवस्थापक व शिपाई यांना निलंबित केले.

सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यात घट आल्याप्रकरणी जिल्हा बँकेने येथील शाखा व्यवस्थापक व शिपाई यांना निलंबित केले. प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर ठपका ठेवून कारवाई केली असून, या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्राथमिक चौकशीत शाखा व्यवस्थापक सुनील पाटील व शिपाई पोपट पाटील यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले. कवठेएकंद शाखेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळल्याने एका ग्राहकाने याबाबतची तक्रार बँकेकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्य शाखेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाखा कार्यालयात जाऊन चौकशी केली. दोन दिवसांच्या चौकशीनंतर त्यांनी याबाबतचा अहवाल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्याकडे सादर केला. वाघ यांनी शाखा व्यवस्थापक व तारण दागिन्यांच्या कामाची जबाबदारी असलेल्या शिपायाला प्रत्यक्ष बोलावून विचारणा केली. त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघ यांनी दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले.निलंबन काळात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यात ते पूर्णत: दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रसंगी फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते.

काय आहे प्रकरणबँकेचे ग्राहक विश्वासराव माधवराव पाटील यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती. १२ एप्रिल रोजी त्यांनी दागिना सोडविल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कवठेएकंद, तासगाव तसेच सांगली शाखेकडे केली. बँकेचे कर्मचारी, सराफ यांच्या समक्ष दागिन्याच्या वजनाची तपासणी केल्यामुळे ही बाब समोर आली.चौकट

अन्य ग्राहकांच्याही तक्रारीपाटील यांच्या तक्रारीनंतर परिसरातील अन्य काही ग्राहकांनीही त्यांच्या तारण सोन्यात घट आढळल्याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची गंभीर दखल बँकेने घेतली आहे.

टॅग्स :Sangliसांगली