शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष मजबुतीसाठी बूथ रचना महत्त्वाची : पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:15 IST

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत.

ठळक मुद्देभाजपची ताकद वाढलीरेठरेधरणपर्यंत पाणी पोहोचून तेथील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न निकालात

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्षामध्ये रोज नवीन कार्यकर्ते दाखल होत आहेत. पक्ष मजबुतीसाठी बूथरचना महत्त्वाची आहे. त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यापूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीत पक्ष टिकविण्याचे काम विक्रम पाटील यांनी केले आहे. यापुढेसुध्दा पक्षाची ताकद वाढविण्याचे इंद्रधनुष्य त्यांनी पेलावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.

येथे वाळवा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत देशमुख बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. देशमुख म्हणाले, देशात व राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वच योजना चांगल्याप्रकारे राबविल्या जात असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हतबल झालेला आहे. वाळवा तालुक्यात नवीन लोक पक्षात घेऊन पक्ष मजबूत करावा.

आमदार नाईक म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे भूमिपूजन केले. ही योजना पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले आहे. शेतकºयांच्या जमिनीचे नुकसान होऊ नये म्हणून पाईपद्वारे ही योजना पूर्ण होईल. रेठरेधरणपर्यंत पाणी पोहोचून तेथील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न निकालात निघेल.नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात परिवर्तन घडवू. साखराळे गावातील ज्या बूथवर जयंत पाटील मतदान करतात, तेथे ग्रामपंचायत निवडणुकीत जादा मतदान घेतले आहे. येडेमच्छिंद्र येथे आमचा सरपंच झालेला आहे.

जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे आपण आष्टा तालुक्याची मागणी केली आहे. ती लवकरच मार्गी लागेल. आष्टा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन करावा, यासाठी सामुदायिक प्रयत्न करू. राहुल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष सयाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी भगवानराव साळुंखे,जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार, गजानन फल्ले, रणधीर नाईक, स्वरुपराव पाटील, तालुकाध्यक्ष शंकर पाटील, प्रसाद पाटील, समीर आगा, संदीपराज पवार, खुदा खिलारे, बजरंग माने, भानुदास पाटोळे, बबनराव शिंदे, युवराज खामकर, नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.आता वन बूथ-टेन बूथ भाजप नेते विक्रम पाटील म्हणालेकी, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अशोकदादा पाटील यांना ३१ हजार ५०० मते मिळाली होती. त्यावेळी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही निर्माण केले. या कार्यकर्त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक आमिषे दाखवली. परंतु स्वाभिमानी कार्यकर्ते आमच्यापासून दूर गेले नाहीत. आतावन बूथ-टेन बूथ ही योजना पूर्ण करु.