शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:34 IST

Local Body Election: पोलिसांनी दोन्ही प्रभागांतील मिळून सात जणांना ताब्यात घेतले

पलूस: पलूस नगरपालिकेसाठी आज, सकाळपासूनच मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यानच, प्रभाग क्रमांक ५ व ७ मध्ये बोगस मतदानाच्या घटना उघडकीस आल्याने वातावरण तणावग्रस्त बनले. विरोधक उमेदवारांनी तीन वेळा  होणारा बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावत संशयित बोगस मतदारांना पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.नगरपालिका निवडणुकीसाठी  काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निलेश येसुगडे तसेच भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असल्याने सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची स्पर्धा दिसत होती. यामुळे वातावरण चांगलेच तापले  असताना, बोगस मतदानाच्या सलग तक्रारींमुळे उमेदवार प्रतिनिधी आणि मतदार यांच्यात वादावादीचे प्रसंग घडले.बोगस मतदानाचा संशय आल्यावर निलेश येसुगडे, मिलिंद येसुगडे, उमेदवार दिगंबर पाटील आणि सिमा माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलिसांना आक्षेप नोंदवत मतदान प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही प्रभागांतील मिळून सात जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ७ मध्ये मतदानासाठी आलेल्या एका महिला मतदाराने मतदान केंद्रासमोर गाडी आणल्याने पोलिस आणि मतदारांमध्ये वाद झाला. काही वेळानंतर पोलिसांनी समजूत काढली; मात्र संबंधित मतदार मतदान न करता परत निघून गेल्याने वातावरण अधिकच तंग झाले.बोगस मतदानाच्या प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी एका संशयितास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. वाढत्या गोंधळामुळे सुरक्षा यंत्रणेला अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. मतदान शांततेत आणि पारदर्शकतेत पार पाडण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. यावेळी उपविभागीय पोलिस उपअधिक्षक अशोकराव भवड, पोलीस निरीक्षक सोमेश्वर जंगम, शशिकांत माळी, अजय माने यांनी घटनास्थळी  धाव घेऊन नागरिकांना पांगवले व वातावरण शांत करून मतदान प्रक्रिया शांततेत चालू ठेवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Palus Bogus Voting Attempt Thwarted, Suspects Handed to Police

Web Summary : Tensions flared in Palus during municipal elections as attempts at bogus voting were foiled in wards 5 and 7. Suspects were apprehended and handed over to the police after opposition candidates intervened. Police are investigating, reinforcing security to ensure fair elections.