शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

Sangli- बेडगला कालव्यात बुडालेल्या दोघांचे मृतदेह चौदा तासानंतर सापडले

By श्रीनिवास नागे | Updated: April 5, 2023 18:08 IST

कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात शोध घेणे अडचणीचे होत असल्याने म्हैसाळ योजनेचे पंप बंद करण्यात आले होते

मिरज : बेडग-मंगसुळी रस्त्यावर म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यात पाय धुण्यासाठी गेल्यानंतर कालव्यात पडलेल्या दोघा तरुणांचे मृतदेह बुधवारी मध्यरात्री कालव्यात सापडले. मंगळवारी दुपारी तिघापैकी एका तरुणास वाचविण्यात यश आले. बाकीचे दोघे कालव्यात बुडाले. सलमान शौकत तांबोळी (वय २०), अरमान हुसेन मुलाणी (२१), नदीम मुलाणी व कुलदीप मौर्य (रा. मंगळवार पेठ, माधवनगर) हे चौघेजण रंगकाम करतात. मंगळवारी एका इमारतीच्या पीओपीच्या कामासाठी ते बेडग-मंगसुळी रस्त्यावर गेले होते. उन्हामुळे हातपाय धूण्यासाठी चौघेजण म्हैसाळ कालव्यात उतरल्यानंतर सलमान व अरमान दोघे पाय घसरून म्हैसाळ कालव्यात पडले. पोहता येत नसल्याने दोघे कालव्यातील पाण्यात वाहून गेले. मिरज ग्रामीण पोलीस व आयुष हेल्पलाईन पथकाने घटनास्थळी बुडालेल्या दोघा तरुणांचा शोध सुरू केला. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु असल्याने कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात शोध घेणे अडचणीचे होत असल्याने म्हैसाळ योजनेचे पंप बंद करण्यात आले होते. अविनाश पवार, सूरज शेख, अमोल होटकर यांनी दिवसरात्र शोध घेतला. सुमारे चाैदा तासांच्या प्रयत्नानंतर पाण्यात बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर दोघांचे मृतदेह सापडले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणे