शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत प्रेयसीच्या मुलाचा फासावर लटकावून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 21:30 IST

मिरज : बिडी आणण्यास नकार दिल्याने प्रेयसीच्या मुलाचा फासावर लटकावून खून करण्यात आला. मिरजेतील ख्वाजा वसाहत येथे रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. गणेश यल्लाप्पा वाल्मिकी (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश हणमंताप्पा तळबार (वय ३५) या संशयितास शहर पोलिसांनी अटक केली आहे.ख्वाजा वसाहतीतील शामराव कांबळे यांच्याकडे ...

मिरज : बिडी आणण्यास नकार दिल्याने प्रेयसीच्या मुलाचा फासावर लटकावून खून करण्यात आला. मिरजेतील ख्वाजा वसाहत येथे रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. गणेश यल्लाप्पा वाल्मिकी (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश हणमंताप्पा तळबार (वय ३५) या संशयितास शहर पोलिसांनी अटक केली आहे.ख्वाजा वसाहतीतील शामराव कांबळे यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन गणेशची आई ज्योती यल्लाप्पा वाल्मिकी (वय ३०) तीन मुलांसोबत राहत होती. तिचे गणेश तळबार याच्याशी अनैतिक संबंध होते. तो गवंडी काम करीत होता. ज्योतीला गणेशसह लक्ष्मी (५ वर्षे) व हणमंत (वय ४, वर्षे) ही मुले आहेत. कौटुंबिक वादातून ज्योतीला पाच वर्षांपूर्वी पतीने सोडून दिले आहे. मुलांसोबत भीक मागून उदरनिर्वाह करीत होती. गणेश तळबार हा ज्योतीच्या घरातच राहत होता. रविवारी सकाळी ज्योती ही सुवर्णा, मंजुळा, शब्बो या महिलांसोबत जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील आठवडा बाजारात भीक मागण्यासाठी गेली होती. गणेश, लक्ष्मी व हणमंत ही मुले घरीच होती.संशयित तळबार याने मोठा मुलगा गणेश यास दुकानातून बिडी आणण्यास सांगितले. गणेश याने बिडी आणण्यास नकार दिल्यामुळे तळबारने लक्ष्मीला बिडी आणण्यास पाठविले. त्यानंतर तळबारने गणेशला ‘बिडी आणण्यास का गेला नाहीस’असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्याने सुती दोरी घेऊन गणेश यास घराच्या तुळईस फासावर लटकवले. गळ्याला फास लागल्याने गणेशचा तडफडून मृत्यू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित तळबार हा घराबाहेर बसला होता. गणेशचा मृतदेह गळफासाने लटकत होता. हा प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला. त्याने तळबारला ताब्यात घेऊन पंचनामा केला.घटनेनंतरही संशयित बिडी ओढत बसला...गणेशला फासावर लटकावून निर्विकार अवस्थेत तळबार हा घराबाहेर बिडी ओढत बसला होता. मुलगी दुकानातून बिडी घेऊन घरी आल्यानंतर भावाचा मृतदेह पाहून तिला हुंदका दाटून आला. ती पळत शेजाऱ्यांकडे गेली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेबाबत माहिती मिळताच मृत गणेशची आई ज्योती ही जयसिंगपूरहून घरी आली. गणेशच्या मृत्यूमुळे ख्वाजा वसाहत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. मुलाच्या खूनप्रकरणी ज्योती वाल्मिकी हिने गणेश तळबार याच्याविरूध्द फिर्याद दिली असून पोलिसांनी गणेश तळबार याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे