लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पार पडलेल्या शिबिरात २०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रतिसाद दिला. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. देवपाल बरगाले व निमाचेच सचिव डॉ. अभिषेक दिवाण यांनी केले. यावेळी युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले, नवी मुंबई विभागप्रमुख भरत माळी, सांगलीतील ज्येष्ठ धारकरी रामभाऊ जाधव, आनंदराव चव्हाण, शिवसेनेचे हरिभाऊ पडळकर, सतीश खांबे, आदी उपस्थित होते.
रक्तदात्यांना आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. सांगलीचे नगरसेवक अभिजित भोसले यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे गरजू कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्राणवायू सेवेस मदत म्हणून हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँकेच्यावतीने एक ऑक्सिजन सिलिंडर भेट देण्यात आला. तसेच या शिबिरास सांगलीतील वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय व हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.